बिग बॉस 13 फेम आसिम रियाज आणि हिमांशी खुरानाच्या रोमँटिक फोटोंची रंगलीय चर्चा, पाहा हे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 07:30 PM2020-03-11T19:30:00+5:302020-03-11T19:40:02+5:30

बिग बॉसच्या सगळ्या सिझनप्रमाणेच बिग बॉस 13 ला देखील प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला होता.

बिग बॉस 13 संपला असला तरी या सिझनमधील स्पर्धकांची आजही सोशल मीडियात चांगलीच चर्चा आहे.

बिग बॉस 13 मध्ये प्रेक्षकांना आसिम रियाज आणि हिमांशी खुराना यांना पाहायला मिळाले होते.

हिमांशी आणि आसिम दोघांनाही बिग बॉस 13 मुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली.

आसिम आणि हिमांशीची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती.

आसिम आणि हिमांशीचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोत त्यांचा रोमँटिक अंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे.

आसिम आणि हिमांशी सध्या एका म्युझिक व्हिडिओसाठी चित्रीकरण करत आहेत.

याच म्युझिक व्हिडिओच्या चित्रीकरणाच्यावेळेस आसिम आणि हिमांशीचा रोमँटिक अंदाज कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

आसिम आणि हिमांशीमधील केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडते.