मोनालिसाच्या निळ्या रंगाच्या साडीतील फोटो पाहून तुम्हीही व्हाल फिदा, सोशल मीडियावर शेअर केला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2020 06:44 PM2020-12-22T18:44:44+5:302020-12-22T18:50:35+5:30

भोजपुरी, बंगाली, ओडिशा, तमिळ, कन्नड आणि तेलुगू सिनेमात मोनालिसाने काम केले आहे. पण भोजपुरी सिनेमा ही तिची पहिली पसंती आहे. तिने जवळपास पन्नास भोजपुरी सिनेमांत काम केले आहे.

साडी परिधान केलेल्या मोनालिसाच्या ग्लॅमरस अदा पाहायला मिळत आहे.

या फोटोत तिने निळ्या साडी परिधान केली असून नाकात नथ, कपाळावर टीकली असा साजश्रृंगार केलेला पाहायला मिळत आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून ती रसिकांसोबत संवाद साधत असते. शिवाय स्वतःचे फोटो आणि विचारही सोशल मीडियावर शेअर करते.

तिने शेअर केलेले साडीतील फोटो सध्या रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. नेहमीच विविध रंगाची साडी परिधान केलेले तिचे फोटो रसिकांना भावतात.

साडीत मोनालिसा अधिक सुंदर दिसते. या फोटोवर मोनालिसाच्या फॅन्स आणि रसिकांकडून लाइक्स-कमेंट्सचा वर्षाव सुरू आहे.

एरव्ही मॉर्डन ड्रेसमध्ये दिसणारी मोनालिसा पारंपरिक अंदाजामध्ये आणखीनच सुंदर दिसत आहे.

यासोबत चेहऱ्यावरील स्मित हास्य रसिकांना अक्षरक्षः क्लीन बोल्ड करत आहे.

या फोटोवर तिच्या फॅन्सकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे.

याआधीही तिने आपल्या सोज्वळ अंदाजाने रसिकांना घायाळ केले आहे.

सोशल मीडियावर तिच्या अदा नेहमीच सा-यांचे लक्ष वेधून घेतात.