PHOTOS: FIR दाखल झाल्यानंतर कॉमेडिअन भारती सिंगला आठवला देव, पोस्ट शेअर करत जोडले हात....

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 12:56 PM2022-05-17T12:56:10+5:302022-05-17T13:01:09+5:30

कॉमेडी क्वीन भारती सिंग (Bharti Singh) पुन्हा एकदा अडचणीत आली आहे. भारतीने तिच्या एका शोदरम्यान दाढी-मिशांवर टीका केली होती, ज्यावरून आता चांगलाच वाद पेटला आहे. (Photo Instagram)

भारतीने केलेल्या दाढी-मिशींवरील कमेंटवरून कॉमेडियनवर एफआयआरही दाखल करण्यात आला आहे. शीख समुदायाच्या लोकांनी तर भारतीचा तीव्र निषेध केला आहे. (Photo Instagram)

पोलिसांनी भारती विरोधात IPC कलम २९५-ए अंतर्गत FIR दाखल केली आहे. SGPC ने FIR दाखल केली आहे. त्याचवेळी, धार्मिक भावना दुखावल्यानंतर भारतीची पहिली पोस्ट सोशल मीडियावर समोर आली आहे. (Photo Instagram)

या संपूर्ण वादात भारतीला देवाची आठवण झाली आहे. कॉमेडियनने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर गणपतीचा फोटो शेअर करून हात जोडणारा इमोजी टाकला केला आहे. या कठीण काळात तिने देवाकडे मदत मागत असल्याचे भारतीच्या पोस्टवरून स्पष्ट होते आहे.(Photo Instagram)

याआधी भारतीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून माफीही मागितली आहे. तिने स्पष्टीकरण देताना सांगितले की, मी ही गोष्ट केवळ गंमतीने बोलले होते. (Photo Instagram)

भारती म्हणाली. ''माझा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि लोक मला पाठवत आहेत आणि विचारत आहेत की तुम्ही दाढी आणि मिशाबद्दल विनोद केला आहे. मी दोन दिवस तो व्हिडीओ पुन्हा पुन्हा पाहतेय आणि म्हणेन की तुम्ही पण तो व्हिडिओ बघा. (Photo Instagram)

ती पुढे म्हणाले, 'मी कधीही कोणत्याही धर्माविषयी किंवा कोणत्याही जातीबद्दल बोललो नाही की या धर्माचे लोक दाढी ठेवतात आणि ही समस्या उद्भवते. पंजाबींना दाढी ठेवली की त्रास होतो असं म्हटलं नाहीय. (Photo Instagram)

मी सर्वसाधारणपणे बोलत होते. माझ्या मित्रासोबत कॉमेडी करत होतो. दाढी आज प्रत्येकजण ठेवतो. पण माझ्या बोलण्याने कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या असतील तर मी हात जोडून माफी मागते. (Photo Instagram)

मी स्वतः पंजाबी आहे. माझा जन्म अमृतसर येथे झाला. मी पंजाबचा अभिमान राखेन आणि मला अभिमान आहे की मी पंजाबी आहे. (Photo Instagram)