'भाभीजी घरपर है' फेम मनमोहन तिवारीच्या मुलीचा सोशल मीडियावर धुमाकुळ, दिसते फारच ग्लॅमरस

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2021 10:38 AM2021-06-13T10:38:57+5:302021-06-13T10:49:51+5:30

आपल्या आई वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांची मुलं मुलीसुद्धा अभिनय क्षेत्रात एंट्री मारणं ही काही नवी बाब राहिली नाही. असेच काहीसं टीव्ही इंडस्ट्रीतील कलाकारांविषयी पाहायला मिळते आहे. यात 'भाभीजी घर पर है' मालिकेतील मनमोहन तिवारी म्हणजे रोहीताश गौरच्या मुलीचीही चर्चा सोशल मीडियावर रंगत आहे.

गीती गौर असे मनमोहन तिवारीच्या मुलीचे नाव असून ती फार सुंदर दिसते.

गीतीने अद्याप अभिनयात पाऊल ठेवले नसले तरी तिने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली आहे.

अनेक ब्रँड आणि मॅगेझिनसाठी तिने मॉडेलिंग केले आहे.

गीती टाइम्सच्या फ्रेश फेस ऑफ द ईयरची 2nd रनर अप ठरली होती.

विशेष म्हणजे गीतीला बॉलिवूडमध्ये झळकण्याचे वेध लागले आहेत.

लवकरच ती बॉलिवूडमध्ये एंट्री करणार असल्याचे बोलले जात आहे.

त्यासाठी सध्या गीती प्रचंड मेहनत घेत आहे.

गीती सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते.

हमीच तिच्या हटके आणि बोल्ड अंदाजातील फोटो पाहून चाहते फिदा होतात.

दिवसेंदिवस तिच्या फॉलोअर्सच्या संख्येतही अधिक वाढ झाल्याचे पाहायला मिळते आहे. 

गीतीला अभिनयाची आवड तर आहेच त्यासोबतच डान्सही तिला प्रचंड आवड आहे.