'पंछी बनू उडती फिरूं मस्त गगनमें' 'बालिका वधू फेम अविका गौरचा डान्सिंग मूड

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 04:22 PM2021-05-10T16:22:24+5:302021-05-10T16:31:25+5:30

'बालिका वधू' आणि 'ससुराल सिमर का' या मालिकेत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनात स्थान मिळवणारी अभिनेत्री अविका गौर गेल्या काही दिवसांपासून बॉयफ्रेंडसोबतच्या नात्यामुळे चर्चेत आली होती. तसेच आपल्या मेकओव्हरमुळेही ती कायम चर्चेत असते.

तुर्तास तिचे सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टायइलने तिने रसिकांवर मोहिनी घातली आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून अविका गौर नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते.

यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर फॅन्ससह शेअर करत असते.

तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत.

अविकाने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर फोटोशूट दरम्यानचे काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोतील तिच्या अदांनी फॅन्सना क्लीन बोल्ड केले आहे.

यात तिने पांढ-या रंगचा पेहराव परिधान केला आहे. फॅन्सना तिचा हा अंदाज आवडला आहे.

त्यांनी फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत असते.

सोशल मीडियावर नजर टाकल्यावर तुम्हाला तिच्या विविध अदा फोटोत कॅमे-यात कॅप्चर झालेल्या पाहायला मिळतील.