छबीदार छबी मी,तोऱ्यात उभी, अपूर्वा नेमळेकरचे फोटो आहेत 'लय भारी'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2020 06:00 AM2020-10-14T06:00:00+5:302020-10-14T06:00:00+5:30

लवकरच अपूर्वा 'तुझं माझं जमतंय 'या आगामी मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो देखील रिलीज झाला आणि अपूर्वाच्या पम्मी या नव्या व्यक्तिरेखेची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती.

आपला दमदार अभिनय आणि सोज्वळ सौंदर्याने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवणारी अभिनेत्री म्हणजे अपूर्वा नेमळेकर.

अपूर्वाने तिने परिधान केलेल्या नऊवारी साडीतील फोटोज चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केले.

नऊवारी साडीतील लूक बघून चाहतेही फिदा होत आहेत.

सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती रसिकांसोबत संवाद साधत असते.

नऊवारी साडीत अपूर्वाचे सौंदर्य आणखी खुलून गेल्याचे दिसत आहे.

नाकात नथ, कपाळावर टीकली असा साजश्रृंगार केलेला पाहायला मिळत आहे.

यासोबत चेहऱ्यावरील स्मित हास्य रसिकांना अक्षरक्षः क्लीन बोल्ड करत आहे.

अपूर्वा आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनाबाबत नेहमीच जास्त सजग असते.

या फोटोवर तिच्या फॅन्सकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे.

याआधीही तिने आपल्या सोज्वळ अंदाजाने रसिकांना घायाळ केले आहे.