साडीमधील अपूर्वा नेमळेकरचा हा लूक पाहिला का?, सौंदर्य गेलं आणखी खुलून

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2020 05:28 PM2020-11-02T17:28:04+5:302020-11-02T17:35:12+5:30

‘रात्रीस खेळ चाले 2’ मालिकेतून शेवंता बनत ती घराघरात प्रसिद्ध झाली मालिका संपल्यानंतर पुन्हा पम्मी बनत तुझं माझं जमतंय नवीन मालिकेतून ती रसिकांच्या भेटीला आली आहे.

पम्मीने नुकतंच डान्सिंग क्वीनच्या मंचावर हजेरी लावली. इतकंच नव्हे तर डान्सिंग क्वीनचा मंच देखील गाजवला.

रिल लाईफप्रमाणे रिअल लाईफमध्येही अपूर्वाला स्टायलिश राहायला आवडते.

ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन दोन्ही लूकला तिचे चाहते भरभरून पसंती देत असतात.

सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे अपूर्वाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली आहे.

साध्या आणि पारंपरिक अंदाजात ती जितकी सुंदर दिसते तितकाच तिचा हा ग्लॅमरस अंदाजही रसिकांना तितकाच भावतो.

याआधीही आपूर्वाचे बरेच फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले होते.

तिचा हा साडीमधील अंदाज कुणालाही घायाळ करेल. सोशल मीडियावर सध्या अपूर्वाच्या याच फोटोची चर्चा रंगली आहे.

यातील एका फोटोत अपूर्वाचा स्टनिंग अंदाज तुम्हालाही क्लीन बोल्ड केल्याशिवाय राहणार नाही.

साडीमधील सिंम्पल पण सोबर लूक तितकाच घायाळ करणारा आहे.