anupamaa fame rupali gangulis latest photoshoot will amazed you
‘अनुपमा’च्या या अभिनेत्रीने वयाच्या 43 व्या वर्षी केले ग्लॅमरस फोटोशूट, फोटो पाहून चाहतेही थक्क By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 08:00 AM2021-02-11T08:00:00+5:302021-02-11T08:00:01+5:30Join usJoin usNext होय, तिचे हे फोटोशूट पाहून चाहतेही थक्क होतील. ‘अनुपमा’ या सध्या टीआरपी लिस्टमध्ये अव्वल असलेल्या मालिकेची लीड अॅक्ट्रेस रूपाली गांगुली सध्या जाम चर्चेत आहे. कारण काय तर तिचे नवे फोटोशूट. होय, तिचे हे फोटोशूट पाहून चाहतेही थक्क होतील. अनुपमा या मालिकेत रूपाली गांगुली अगदी साध्या सरळ महिलेच्या भूमिकेत असली तरी ख-या आयुष्यात ती चांगलीच ग्लॅमरस आहे. याचा प्रत्यय तुम्हाला तिचे हे ताजे फोटो पाहिल्यानंतर येईल. यातील तिचा अवतार आॅनस्क्रीन रोलच्या अगदी विरूद्ध आहे. रूपाली गांगुलीने वयाची चाळीशी कधीच पूर्ण केली आहे. सध्या ती 43 वर्षाची आहे. रूपालीने टीव्ही इंडस्ट्रीत प्रचंड काम केले आहे. टीव्हीचा ती एक लोकप्रिय चेहरा आहे. संजीवनी या मालिकेतून रूपाली गांगुली नावारूपास आली होती. या मालिकेने तिला एक नवी ओळख दिली होती. अनुपमा या मालिकेबद्दल सांगायचे तर सध्या ही मालिका टीआरपी लिस्टमध्ये अव्वल आहे आणि सध्या रूपाली गांगुली टीव्हीची नंबर वन अॅक्ट्रेस बनली आहे. 1985 साली वयाच्या 7 व्या वर्षी साहेब या मालिकेतून तिने आपल्या अॅक्टिंग करिअरची सुरुवात केली होती. 2000 साली सुकन्या या मालिकेतून तिने टीव्हीवर डेब्यू केला होता.टॅग्स :टेलिव्हिजनTelevision