पवित्र रिश्ता!! अंकिता लोखंडेची लगीनघाई, पाहा, प्री-वेडिंग सेरेमनीचे खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2021 01:59 PM2021-12-03T13:59:59+5:302021-12-03T14:10:00+5:30

Ankita Lokhande-Vicky Jain Pre-Wedding: मैत्री, प्रेम ते लग्न... ! अभिनेत्री अंकिता लोखंडे येत्या 14 डिसेंबरला विकी जैनसोबत लग्नगाठ बांधणार आहे. लग्नाच्या विधी सुरू झाल्या आहेत.

कतरिना कैफ व विकी कौशल या जोडप्यासोबतच आणखी एक जोडपं लग्नबंधनात अडकणार आहे. होय, अभिनेत्री अंकिता लोखंडे येत्या 14 डिसेंबरला विकी जैनसोबत लग्नगाठ बांधणार आहे. तर या लग्नाच्या विधी सुरू झाल्या आहेत.

अलीकडे अंकिता व विकी एकता कपूरकडे लग्नाची निमंत्रण पत्रिका घेऊन गेले होते. आता दोघांची प्री-वेडिंग सेरेमनी सुरू झाली आहे.

अंकिता आणि विकी यांनीसुद्धा इन्स्टाग्रामवर काही खास फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये दोघंही पारंपरिक लूकमध्ये पहायला मिळत आहेत.

‘पवित्र’ असं कॅप्शन देत अंकिताने लग्नविधीचा फोटो शेअर केला आहे. सोबत हार्ट इमोजीही पोस्ट केल्या आहेत.

फोटोंमध्ये अंकिता पोपटी रंगाच्या साडीत आहे. तर विकीनं पांढ-या रंगाचा कुर्ता-पायजामा घातला आहे. अंकिताच्या हातात हिरवा चुडा आहे तर दोघांनीही मुंडावळ्या बांधल आहेत.

हे फोटो एका धार्मिक विधीचे आहेत. सर्व फोटो दृष्ट लागावी इतके सुंदर आहेत. दोघंही नेहमीप्रमाणे आनंदात आहेत.

काही दिवसांपूर्वीच अंकिताने गर्ल गँगसोबत बॅचलर पार्टी एन्जॉय केली होती. या पार्टीतही अंकिता धम्माल मस्ती करताना दिसली होती.

अंकिताच्या 34 व्या बर्थ डे पार्टीत विकी जैन पहिल्यांदा दिसला होता. यानंतर दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.

2019 मध्ये विकीनं अंकिताला लग्नासाठी प्रपोज केलं होतं. विकीआधी अंकिता दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत रिलेशनशिपमध्ये होती. पण कालांतराने त्यांच ब्रेकअप झालं होतं.

Read in English