राणादा आणि अंजली बाईंचा जीव रंगला! वहिनीसाहेबांनीदेखील दिला ग्रीन सिग्नल, पाहा हे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2022 01:29 PM2022-05-04T13:29:46+5:302022-05-04T13:39:22+5:30

Tuzyat Jeev Rangala Fame Hardik Joshi And Akshaya Deodhar: 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील राणादा आणि अंजली बाई म्हणजेच हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांचा काल साखरपुडा पार पडला.

तुझ्यात जीव रंगला मालिकेतील राणादा आणि अंजली बाई म्हणजेच हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांचा काल साखरपुडा पार पडला.

हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर रिलेशनशीपमध्ये असल्याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू होती. मात्र त्यांनी या चर्चेवर मौन सोडले नव्हते.

परंतु, काल अक्षया आणि हार्दिक यांनी सोशल मीडियावर साखरपुड्याचे फोटो शेअर करत ते रिलेशनशीपमध्ये असल्याचे जाहीर केले.

अक्षया आणि हार्दिक यांच्या साखरपुड्याच्या पोस्टवर चाहते लाइक्स आणि शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. इतकेच नाही तर त्यांचे हे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.

दरम्यान अक्षया आणि हार्दिकच्या साखरपुड्याला तुझ्यात जीव रंगला मालिकेतील सहकलाकार वहिनीसाहेब म्हणजेच धनश्री कांडगावकर हिनेदेखील हजेरी लावली होती.

धनश्री काडगावकर हिने त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करून तिने लिहिले की, आणि आज नंदिता ला राना अंजलीच्या एकत्र येन्याशी काहिच हरकत नाही…..

तसेच यावेळी तुझ्यात जीव रंगला मालिकेतील काही कलाकारांनी या साखरपुड्याला हजेरी लावली होती.

धनश्रीच्या या पोस्टवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.