IN PICS : म्हणून उमेश कामतनं ‘अजुनही बरसात आहे’ मालिकेला होकार दिला...!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2021 05:30 PM2021-07-04T17:30:00+5:302021-07-04T17:30:03+5:30

Ajunahi Barsat Aahe : मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता उमेश कामत आणि लोकप्रिय अभिनेत्री मुक्ता बर्वे तब्बल 8 वर्षांनी एकत्र येत आहेत. होय, ‘अजुनही बरसात आहे’ ही दोघांची मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतेय.

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता उमेश कामत आणि लोकप्रिय अभिनेत्री मुक्ता बर्वे तब्बल 8 वर्षांनी एकत्र येत आहेत. होय, ‘अजुनही बरसात आहे’ ही दोघांची मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतेय.

साहजिकच उमेश व मुक्ताचे चाहते खूश्श आहेत. गेल्या 8 वर्षांपासून उमेश छोट्या पडद्यापासून दूर होता. आता खुद्द उमेशने यामागचे कारण सांगितले आहे.

ई-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत उमेश यावर बोलला. गेल्या 8 वर्षांत अनेक मालिकांसाठी मला विचारणा झाली. परंतु मी त्याला नकार दिला. कारण त्यात काहीही वेगळेपण नव्हतं आणि मला त्याच त्या भूमिकांमध्ये रस नव्हता, असे त्याने सांगितले.

‘अजूनही बरसात आहे’ या मालिकेत असं काय खास आहे की, उमेशनं ही मालिका स्वीकारली? असा प्रश्न आता तुम्हाला पडला असावा. उमेशचं मानाल तर खास आहेच.

उमेश यावर म्हणाला, 8 वर्ष सतत मालिकांमध्ये काम करण्यास नकार दिल्यावर ‘अजूनही बरसात आहे’ ही मालिका मी का स्वीकारली, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर नक्कीच या मालिकेत खास असं काही आहे. मला हवं होतं तसं पात्र, तशी भूमिका या मालिकेच्या निमित्तानं मला मिळाली.

‘अजूनही बरसात आहे’मध्ये काम करण्यामागचं आणखी एक खास कारणही त्यानं सांगितलं. ते म्हणजे, मुक्ता. होय, ही मालिका स्वीकारण्याचं आणखी एक कारण मुक्ता होती. मुक्ता एक गुणी अभिनेत्री आहे. तिच्याकडून मला आता शिकायला मिळणार आहे. माझ्यासाठी ही एक संधी होती आणि मी ती स्वीकारली, असं तो म्हणाला.

अजूनही बरसात आहे ही मालिका सोनी मराठीवर येत्या 12 जुलैपासून प्रसारित केली जाणार आहे. मीरा आणि आदी यांची एक आगळीवेगळी प्रेमकथा या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

उमेश कामत आणि मुक्ता बर्वे या दोघांचा आपला असा एक खास चाहता वर्ग आहे. त्यामुळे त्यांना छोट्या पडद्यावर परतताना बघून चाहते जाम खुश आहेत.