हृता दुर्गुळेने प्रेमाची कबुली दिल्यानंतर शेअर केला रोमँटिक फोटो, फोटो होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 03:46 PM2021-11-22T15:46:01+5:302021-11-22T15:57:45+5:30

नुकतीच हृता दुर्गुळेने सोशल मीडियावर फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली आहे.

नुकतीच हृता दुर्गुळेने सोशल मीडियावर फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली आहे.

पुन्हा एकदा हृता दुर्गुळेने बॉयफ्रेंडसोबतचा फोटो शेअर केला आहे आणि म्हटले की, जेव्हा मी तुझ्याबरोबर असते तेव्हा मला मी जास्त भावते.

यापूर्वी फोटो शेअर करत हृताने प्रेमाची कबुली दिली होती. तिने फोटो शेअर करत लिहिले की, मला तुझ्यामध्ये अशी आशा सापडली आहे. जी मला कधीच माहित नव्हती.

हृता दुर्गुळेच्या आयुष्यात एन्ट्री करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे प्रतीक शाह. तो चित्रपट दिग्दर्शक आहे.

हृता दुर्गुळेच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे.

हृता दुर्गुळेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

हृता सध्या मन उडु उडु झालं या मालिकेत काम करते आहे. लवकरच ती अनन्या या चित्रपटातही झळकणार आहे.

Read in English