कॉल सेंटरमध्ये जॉब अन् प्रेमात अपयश; कलाविश्वापासून दूर गेलेली 'नागिन'फेम Adaa Khan पाहा सध्या काय करते?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 01:39 PM2022-05-12T13:39:38+5:302022-05-12T13:42:57+5:30

Adaa Khan: २००९ साली 'पालमपूर एक्स्प्रेस'मधून अदाने तिच्या टेलिव्हिजन करिअरला सुरुवात केली. या मालिकेनंतर तिला अनेक भूमिका मिळाल्या.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अदा खान (Adaa Khan). गेल्या कित्येक काळापासून अदा कलाविश्वापासून दूर आहे. त्यामुळे सध्या ती काय करते असा प्रश्न नेटकऱ्यांना पडतो.

एकता कपूरच्या नागिन या मालिकेत तिने शेष नागिन ही भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे तिला तुफान लोकप्रियता मिळाली.

सुरुवातीच्या काळात अदा तिच्या ग्लॅमरस लूक आणि स्टाइल स्टेटमेंटमुळे अनेक अभिनेत्रींवर मात करत होती. मात्र, सध्या ती सगळ्यांपासून दूर गेल्याचं पाहायला मिळतं.

कलाविश्वात नाव कमावणाऱ्या अदाला या क्षेत्रात यायचं नव्हतं. त्यामुळे ती पूर्वी एका कॉल सेंटरमध्ये नोकरी करत होती.

कॉल सेंटरमध्ये काम करत असताना तिला १५ हजार रुपये पगार मिळत होता.

अदा अभिनेत्री असण्यासोबत बेली डान्सरदेखील आहे. अदाने एका जाहिरातीपासून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. एका कॉफी शॉपमध्ये तिला दिग्दर्शकांनी तिला पाहिलं आणि तिथेच तिला पहिली ऑफर मिळाली.

२००९ साली पालमपूर एक्स्प्रेसमधून अदाने तिच्या टेलिव्हिजन करिअरला सुरुवात केली. या मालिकेनंतर तिला अनेक भूमिका मिळाल्या.

२०१३ मध्ये अदाच्या आईचं कॅन्सरमुळे निधन झालं. ज्यामुळे ती प्रचंड खचून गेली होती.

अदाने अभिनेता अंकित गेराला डेट केलं असून अभिनेत्री रुपल त्यागीमुळे त्यांच्या नात्यात दुरावा आला असं अदाने एका मुलाखतीत सांगितलं.

अलिकडेच अदा नागिन ६ मध्ये कॅमियो रोलमध्ये झळकली होती.

सध्या अदाचा कलाविश्वातील वावर कमी झाला असून तिच्याकडे कोणताही मोठा प्रोजेक्ट नाही.