कॉल सेंटरमधील नोकरी ते टीव्हीवरील नागिन असा आहे अदा खानचा प्रवास !

Published: May 12, 2021 10:49 AM2021-05-12T10:49:36+5:302021-05-12T11:44:51+5:30

अदा खान (Adaa khan) टीव्ही इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अदाने आपल्या अभिनयाच्या जोरावर खूप कमीवेळात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. (Photo Instagram)

अदा आज आपला 32 वा वाढदिवस सेलिब्रेट करते आहे. आज अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध असलेल्या अदाने कधीकाळी तिने कॉल सेंटरमध्ये देखील काम केले आहे. (Photo Instagram)

अदाचा जन्म मुंबईतल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. लहानपणापासूनच तिला अभिनयाची आवड होती. (Photo Instagram)

अदाच्या वडिलांची नोकरी अचानक गेल्या त्यामुळे घरात आर्थिक चणचण भासू लागली म्हणून कॉलेजच्या दिवसांत तिने कॉल सेंटरमध्ये नोकरी केली.(Photo Instagram)

त्यावेळी तिला महिन्याला केवळ 3 हजार रुपये पगार मिळायचा ज्याने ही घराचे हफ्ता भरायची. (Photo Instagram)

अदा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आपले फोटो ती पोस्ट करत असते जे खूप व्हायरल होतात. (Photo Instagram)

अदाने तिच्या करिअरची सुरुवात मॉडलिंगपासून केली होती. (Photo Instagram)

सोनी इंडियाच्या टीव्ही शो 'पालमपूर एक्स्प्रेस' मधून तिने टीव्ही इंडस्ट्रीत प्रवेश केला. (Photo Instagram)

अदा खानने टीव्ही शो 'बहनें' मध्ये आकाशीची भूमिका केली होती. त्याचबरोबर तिने अमृत मंथन शोमध्ये 'अमृत' ची भूमिका साकारली होती. (Photo Instagram)

एकता कपूरच्या शो नागीनमध्ये शेषाची व्यक्तिरेखा साकारून अदा घराघरात पोहोचली. या भूमिकेत अदा खानला चांगलीच पसंती मिळाली होती. (Photo Instagram)

अदा तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेच असते. सोशल मीडियावर तिचे लाखो चाहते आहेत. (Photo Instagram)

अदाच्या अभिनया इतकीच तिच्या सौंदर्याची देखील चर्चा असते. (Photo Instagram)

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!