हा तर योगा योग, अभिनेत्रीला लागलं कठीण आसनाचं व्यसन,पतीसोबतच्या योगा मुव्हज पाहून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 01:06 PM2021-05-18T13:06:11+5:302021-05-18T13:20:04+5:30

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आशका गोराडिया हिचे योगा करतानाचे फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. पुन्हा एकदा आशकाने भन्नाट योगा मुव्हजचा फोटो शेअर करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच दिला आहे.

अभिनेत्री आशकाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर केले आहेत.

आशका नेहमीच समुद्र किनारी पती पती ब्रेंट गोबलसह योगा करताना दिसते .

योगाचे वेगवेगळे प्रकार अगदी सहजरित्या करणं हेच आशकाच्या फिटनेसचं खरं रहस्य आहे.

केवळ आशकालाच नाही तर पती ब्रेंड गोबललादेखील योगाची प्रचंड आवड असल्याचे तिच्या या फोटोंवरुन स्पष्ट होते.

अनेक वर्षांपासून आशका पती ब्रेंटसोबत नियमितपणे योगाभ्यास करत आहे.

या दोघांचे योगा पोजेस पाहून भल्या भल्यांची बोलती बंद होते.

पती पत्नीचे योगा प्रेम पाहून इतरांनाही योगा करण्याची प्रेरणा मिळते हे मात्र नक्की.

सुंदर आणि फीट दिसणं यासाठी आशका गोराडीया खूप मेहनत घेते.

दिवसाची सुरुवात ती योगसन करण्यापासूनच करते.

आशका गोराडियाचे पती ब्रेंड गोबलसह योगा फोटोज इटनेरनेटवर भरपूर वायरल झाले आहेत.