Holi 2020 : रंग बरसे...! रंगाची उधळण करताना कृतिका गायकवाड दिसली लयभारी, पहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2020 07:00 AM2020-03-10T07:00:00+5:302020-03-10T07:00:00+5:30

Krutika Gaikwad

होळीचा सण म्हणजे बेधुंद होत संस्मरणीय क्षणांना रंगांनी न्हाऊ घालणे! प्रत्येकजण या सणाचा आनंद लुटत असतो. तसाच रंगाचा आनंद अभिनेत्री व नृत्यांगना कृतिका गायकवाडने लुटला आहे.

कृतिका गायकवाडने इंस्टाग्रामवर होळीच्या रंगात रंगलेले फोटो शेअर केले आहेत.

या फोटोशूटमध्ये तिने पांढऱ्या रंगाच्या साडीवर गुलाबी फुलाची डिझाईन असणारी साडी परिधान केली आहे.

या फोटोशूटमध्ये ती खूपच सुंदर दिसते आहे.

रंगांनी रंगलेले फोटो शेअर करत तिने होळी मूड असे कॅप्शन दिले आहे.

कृतिका सोशल मीडियावर सक्रीय असून ती नेहमी फोटो शेअर करत असते.

कृतिकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती झी युवा वाहिनीवरील डान्सिंग क्वीन शोमध्ये आपल्या नृत्याचा जलवा दाखवते आहे.

बंदिशाला’ (Bandishala) या चित्रपटात तिने ठसकेबाज लावणी सादर केली होती.

या लावणीला प्रेक्षकांचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला.

याशिवाय कृतिकाने लाखों है यहाँ दिलवाले, विठ्ठला शप्पथ या चित्रपटात काम केले आहे.

लवकरच तिचा नेबर्स हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

दिग्दर्शक विनय श्रीरंग घोलप यांच्या या चित्रपटात एका तरुणीची गूढरम्य कहाणी चित्रित करण्यात आली आहे.

विज्ञान-तंत्रज्ञानाची कल्पनारम्य कथा असलेल्या या चित्रपटात चेतन चिटणीस, कृत्तिका गायकवाड, सिद्धार्थ बोडके, प्रसाद जावडे, शैलेश दातार, नेहा बंब, अदिती येवले आदी कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.

हा चित्रपट येत्या २० मार्चला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.