Aai Kuthe Kay Karte मधील संजनाचा साडीतील नखरा,फोटोवरच खिळल्या नजरा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 12:08 PM2021-11-12T12:08:10+5:302021-11-12T12:19:46+5:30

रुपाली भोसलेने निळ्या रंगाच्या पैठणीतला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत रुपालीचे सौंदर्य आणखी खुलून आले आहे. ती आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनाबाबत नेहमीच जास्त सजग असते.

आई कुठे काय करते मालिकेतली संजना म्हणजे रूपाली भोसलेची सोशल मीडियावर चर्चा रंगत आहे.

तिने नुकतेच नवीन फोटो शेअर केले आहेत.

रुपालीचे हे फोटो वारंवार पाहिले जात आहेत.

हे फोटोही तसे खासच आहेत.

कारण रुपाने पैठणी परिधान करत हे फोटो क्लिक केले आहेत.

पैठणीमुळे रुपालीच्या सौंदर्यातही अधिक भर पडली आहे.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

यासोबत चेहऱ्यावरील स्मित हास्य रसिकांना अक्षरक्षः क्लीन बोल्ड करत आहे.

याआधीही तिने आपल्या सोज्वळ अंदाजाने रसिकांना घायाळ केले आहे.