सौंदर्याचा अँटम बॉम्ब! 'आई कुठे काय करते?'मधील विमलचा रिअल लाइफ ग्लॅमरस अवतार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 10:39 AM2021-10-14T10:39:41+5:302021-10-14T10:49:34+5:30

Seema Ghogale: मालिकेतील मुख्य पात्रांसोबतच अनेकदा चर्चेत येत असते ती म्हणजे ओन्ली विमल. देशमुखांच्या घरात अरुंधतीला घरकामात मदत करणारी विमल तिच्या हटकेबाज कोकणी भाषेमुळे चर्चेत असते.

छोट्या पडद्यावर तुफान गाजत असलेली मालिका म्हणजे 'आई कुठे काय करते?' या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत.

लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या या मालिकेतील आई, आप्पा, अनिरुद्ध, अरूंधती, संजना ही पात्र सध्या तुफान गाजत आहेत.

मालिकेतील मुख्य पात्रांसोबतच अनेकदा चर्चेत येत असते ती म्हणजे ओन्ली विमल. देशमुखांच्या घरात अरुंधतीला घरकामात मदत करणारी विमल तिच्या हटकेबाज कोकणी भाषेमुळे चर्चेत असते.

पडद्यावर घरकाम करणाऱ्या स्त्रीची भूमिका साकारणारी विमल खऱ्या आयुष्यात प्रचंड ग्लॅमरस आहे.

कलाविश्वाप्रमाणेच विमल सोशल मीडियावरही सक्रीय आहे. यात अनेकदा ती तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

विमल ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचं नाव सीमा घोगले असं असून तिने यापूर्वी अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे.

सीमा अनेकदा अभिनेत्री अपूर्वा गोरेसोबत डान्स व्हिडीओ शेअर करत असते.

अलिकडेच तिने नवरात्रीनिमित्त गरब्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.

'कुमारी गंगुबाई मॅट्रिक' सह सीमाने अनेक नाटकांमध्ये काम केलं आहे.

नाटकादरम्यान अभिनय करताना सीमा

सीमाने शेअर केलेला एक छानसा फोटो