आदेश बांदेकरांचा मुलगादेखील आहे अभिनेता; लोकप्रिय मालिकेत केलं आहे काम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 10:17 AM2021-10-13T10:17:37+5:302021-10-13T10:26:54+5:30

Aadesh bandekar: आदेश आणि सुचित्रा यांचा सोहम हा एकुलता एक मुलगा असून त्यानेदेखील कलाविश्वात पदार्पण केलं आहे.

'होम मिनिस्टर' या लोकप्रिय कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे आदेश बांदेकर. आज उभ्या महाराष्ट्रात त्यांचा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळेच त्यांच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात.

आदेश बांदेकर यांनी लोकप्रिय अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. विशेष म्हणजे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणून या दोघांकडे पाहिलं जातं.

आदेश आणि सुचित्रा यांचा सोहम हा एकुलता एक मुलगा असून त्यानेदेखील कलाविश्वात पदार्पण केलं आहे.

आपल्या आई-वडिलांप्रमाणेच कलाविश्वात पदार्पण करणारा सोहम सोशल मीडियावरही तितकाच सक्रीय आहे.

सोहम अनेकदा आदेश व सुचित्रा यांच्यासोबतचे काही फोटो शेअर करत असतो.

सोहमने वेगवेगळ्या मूडमध्ये त्याचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या सोहमने अलिकडेच छोट्या पडद्यावर पदार्पण केलं आहे.

स्टार प्रवाहवरील ‘नवे लक्ष्य’ या मालिकेच्या माध्यमातून त्याने मराठी कलाविश्वात एण्ट्री केली आहे.

‘नवे लक्ष्य’ ही सोहमची पहिलीच मालिका असून त्याने पोलिसांची भूमिका साकारली आहे. या मालिकेची निर्मिती आदेश बांदेकर यांच्या सोहम प्रोडक्शन्सने केली आहे.