आता WhatsApp वरही करा मेसेज शेड्यूल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2019 04:28 PM2019-01-16T16:28:17+5:302019-01-16T16:42:08+5:30

WhatsApp हे मेसेजिंग अ‍ॅप अत्यंत लोकप्रिय आहे. WhatsApp सातत्याने युजर्ससाठी नवनवीन फीचर घेऊन येत असतं. बर्थ डे, न्यू इयर किंवा लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे मेसेज पाठवण्यासाठी रात्री 12 वाजेपर्यंत वाट पाहावी लागते. मात्र अशा वेळी तो मेसेज शेड्यूल करून ठेवण्याचा एक पर्याय आहे.

WhatsApp वर मेसेज शेड्यूल करु शकू असे कोणतेही फीचर अद्याप आलेले नाही. मात्र थर्ड पार्टी अ‍ॅपच्या मदतीने हवं तेव्हा मेसेज पाठवता येतात.

WhatsApp शेड्यूलर, डू इट लेटर, SKEDit सारख्या अ‍ॅपच्या मदतीने फक्त टेक्स्ट मेसेज नाही तर फोटो आणि व्हिडीओ शेड्यूल करू शकता.

सर्वप्रथम WhatsApp शेड्यूलर किंवा अन्य कोणतेही थर्ड पार्टी अ‍ॅप डाऊनलोड करा. अ‍ॅपला अ‍ॅक्सेसबिलिटी परमिशन देण्यासाठी सेटींगमध्ये जाऊन अ‍ॅक्सेसबिलिटी मध्ये सर्व्हिसेस वर क्लिक करून टॉगल इनेबल करा.

WhatsApp वर कॉन्टॅक्ट किंवा ग्रुप सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्हाला हवी असलेली तारीख आणि वेळ सेट करा. त्यानंतर मेसेज टाईप करण्यासाठी पर्याय मिळेल.

मेसेज टाईप केल्यानंतर वरच्या दिशेने उजव्या बाजूला क्रिएटचं बटण आहे. त्यावर क्लिक करून मेसेज हवा तेव्हा शेड्यूल करता येतो.

WhatsApp वर एकाच वेळी मल्टिपल मेसेजही अशाच पद्धतीने शेड्यूल करता येतात. मात्र हे मेसेज शेड्यूल करताना त्याचा वेळ सारखाच नसावा.

2019 या नववर्षात WhatsApp वर PiP मोड, डार्क मोड, ग्रुप कॉल शॉर्टकट यासह अनेक भन्नाट फीचर्स येणार आहेत. याच यादीत आता आणखी एका फीचरचा समावेश होणार आहे. WhatsApp वर लवकरच एकाच वेळी 30 ऑडिओ क्लिप पाठवणं शक्य होणार आहे.