सर्वात मोठ्या बॅटरीवाला स्मार्टफोन भारतात लाँच; लेटेस्ट प्रोसेसर अन् किंमतही कमी, प्रश्नच मिटला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 13:45 IST2025-06-25T13:38:49+5:302025-06-25T13:45:48+5:30

Poco F7 Launched, news in Marathi: लेटेस्ट प्रोसेसर आणि कमी किंमत असे या फोनचे वैशिष्ट्य आहे.

भारतीय स्मार्टफोन बाजारात लॅपटॉपलाही चार्ज करू शकणारा स्मार्टफोन दाखल झाला आहे. शाओमीचा ब्रँड POCO F7 भारतात लाँच झाला आहे. लेटेस्ट प्रोसेसर आणि कमी किंमत असे या फोनचे वैशिष्ट्य आहे.

पोको एफ ७ मध्ये स्नॅपड्रॅगन 8s Gen 4 चिपसेट देण्यात आला आहे, तसेच कुलिंगसाठी 6,000mm व्हेपर कूलिंग चेंबर देण्यात आला आहे. या फोनमध्ये 12GB RAM देण्यात आली असून तुम्हाला 512GB पर्यंत स्टोरेज मिळणार आहे.

पाठीमागे 50-मेगापिक्सेल सोनी IMX882 सेन्सर, 8MP अल्ट्रा वाईड सेन्सर आणि पुढे 20-मेगापिक्सेल सेल्फी स्नॅपर देण्यात आला आहे.

पाणी, धुळीपासून संरक्षणासाठी या फोनमध्ये IP66+IP68+IP69 रेटिंग देण्यात आले आहे. भारतात हा फोन तब्बल 7,550mAh बॅटरीसह देण्यात आला आहे. या कंपनीच्या जगासाठीच्या व्हेरिअंटमध्ये 6,500mAh बॅटरी देण्यात आली आहे. 90W चार्जिंग सपोर्ट मिळणार आहे.

Poco F7 5G ची किंमत 12GB + 256GB व्हेरिएंटसाठी 31,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 12GB + 512GB व्हेरिएंटची किंमत 33,999 रुपये ठेवण्यात आली आहे.

सायबर सिल्व्हर एडिशन, फ्रॉस्ट व्हाइट आणि फँटम ब्लॅक अशा तीन रंगांमध्ये तो ऑनलाईन ईकॉमर्स साईटवर विक्रीसाठी उपलब्ध केला जाणार आहे.

या फोनमध्ये कंपनीने 6.83-इंचाचा OLED डिस्प्ले दिला आहे. 120Hz रिफ्रेश रेट आणि 3200 Nits च्या पीक ब्राइटनेस यामध्ये आहे. स्क्रीन प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i देण्यात आला आहे.

या फोनमध्ये अँड्रॉइड १५-आधारित हायपरओएस २.० देण्यात आली असून चार वर्षांचे प्रमुख ओएस अपग्रेड आणि सहा वर्षांचे सुरक्षा अपडेट दिले जाणार आहेत.

टॅग्स :शाओमीxiaomi