अरे वा! WhatsApp आता फिंगरप्रिंटने होणार ओपन, जाणून घ्या कसं

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2019 04:58 PM2019-01-10T16:58:08+5:302019-01-10T17:18:52+5:30

WhatsApp हे लोकप्रिय माध्यम आहे. युजर्सचं चॅटींग आणखी मजेशीर होण्यासाठी WhatsApp सातत्याने नवनवीन फीचर्स आणत असतं. 2019 या नववर्षात WhatsApp वर PiP मोड, डार्क मोड, ग्रुप कॉल शॉर्टकट यासह अनेक भन्नाट फीचर्स येणार आहेत. याच यादीत आता आणखी एका फीचरचा समावेश होणार आहे.

WhatsApp लवकरच युजर्सची सुरक्षितता लक्षात घेऊन एक जबरदस्त फीचर आणणार आहे. फिंगरप्रिंटच्या मदतीने आता WhatsApp ओपन करता येणार आहे.

finger Print हे WhatsApp चं नवं फीचर Android आणि IOS या दोन्ही व्हर्जनवर हे लवकरच येणार आहे. या फीचरमुळे दुसरी कोणतीही व्यक्ती तुमचं WhatsApp ओपन करू शकणार नाही.

फिंगरप्रिंट फीचरसाठी WhatsApp आपल्या App मध्ये एक नवे सेक्शन सुरू करणार आहे. ज्यामध्ये युजर्सला फिंगरप्रिंट फीचर वापरण्याचा पर्याय देण्यात येईल. भविष्यात हे फीचर IOS अपडेट मध्येही उपलब्ध होणार असून या नव्या फीचरमुळे युजर्सची प्रायव्हसी अधिकच सुरक्षित होईल.

युजर्सच्या सुरक्षेच्या दृष्टीने WhatsApp ने हे नवं फीचर आणण्याचा विचार केला आहे. तसेच WhatsApp 'फेस आयडी' आणि 'टच आयडी' फीचरवर देखील काम करत आहे.

WhatsApp वरील या नव्या फिंगरप्रिंट फीचरची सध्या चाचणी सुरू असून लवकरच ते युजर्ससाठी येणार आहे. या फीचरमुळे WhatsApp ची सुरक्षा अधिक मजबूत होणार आहे.

WhatsApp वर एकाच वेळी 30 ऑडिओ क्लिप पाठवणं देखील आता शक्य होणार आहे. या नव्या अपडेट फीचरमुळे युजर्सला ऑडिओ क्लिप पाठवणे आणखी सोपे होणार आहे. यामध्ये ऑडिओ क्लिपचा ऑडिओ प्रिव्ह्यू आणि इमेज प्रिव्ह्यू दिसणार आहे. WhatsApp वर लवकरच हे फीचर येणार आहे.

WhatsApp ने काही दिवसांपूर्वीच PiP (पिक्चर-इन-पिक्चर) हे फीचर सुरू केले आहे. यामध्ये युजर्सला चाटिंगमध्येच कोणतेही यूट्यूब किंवा फेसबुकचे व्हिडीओ पाहायला मिळतात. तसेच 2019 या वर्षात Dark Mode फीचर, Private Reply फीचर, क्यूआर कोड स्कॅन कॉन्टॅक्ट फीचर, कॉन्टॅक्ट रँकींग फीचर, मल्टीपल व्हॉईस मेसेज फीचर येणार आहेत.