WhatsApp चॅट्स आता लीक होणार नाही, युजर्संना लवकरच मिळणार नवीन फीचर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2021 04:16 PM2021-03-08T16:16:29+5:302021-03-08T16:37:51+5:30

whatsapp is working on cloud chat backup encryption : एन्क्रिप्शन नसल्यामुळे चॅट्सचे बॅकअप सहजपणे लीक होत होते.

व्हॉट्सअ‍ॅपच्या (WhatsApp) चॅट्स एंड टू एंड एन्क्रिप्टेड होत असतात. परंतु चॅट्सचे बॅकअप क्लाउडवर एंड टू एन्क्रिप्टेड होत नाहीत. दरम्यान, यामध्ये एन्क्रिप्शन एन्क्रिप्शन होत असते.

मात्र, हे सहजपणे ब्रेक केले जाऊ सकते. एन्क्रिप्शन नसल्यामुळे चॅट्सचे बॅकअप सहजपणे लीक होत होते. अलीकडेच याचे एक उदाहरणही दिसून आले आहे.

अलीकडेच अनेक सेलिब्रिटींचे चॅट लीक झाले होते. त्यानंतर व्हॉट्सअ‍ॅपच्या गोपनीयतेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यानंतर समजले की, या लीक चॅट्स क्लाउडवर बॅकअपसाठी जाणारे चॅट्स आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप चॅट लीकमुळे बॉलिवूडमध्ये ड्रग्स प्रकरणासंबंधीत अनेक खुलासे समोर आले होते. ज्यावरून ड्रग्ससंबंधित सेलिब्रिटींची चौकशी करण्यात आली होती.त्यामुळे असे समजते की, व्हॉट्सअ‍ॅप आता चॅट बॅकअपच्या गोपनीयतेवर काम करत आहे.

असे झाल्यास व्हॉट्सअ‍ॅपवरून चॅट बॅकअप लीक करणे सोपे होणार नाही. कारण, व्हॉट्सअ‍ॅप एका नव्या फिचरवर काम करत आहे.या फीचरपासून क्लाउडवर स्टोअर चॅट बॅकअपला अॅक्सेस करण्यासाठी पासवर्डची आवश्यक असेल.

यामुळे क्लाउडवर देखील एन्क्रिप्टेड राहील. पासवर्ड दिल्यानंतरच युजर्सला अॅक्सेस दिला जाऊ शकतो. व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन फीचरवर नजर ठेवणारी WABetaInfoने ही माहिती दिली आहे.

WABetaInfoच्या मते, हे फीचर लवकरच अँड्रॉइड आणि आयओएस दोन्हीसाठी जारी केले जाईल. चॅट बॅकअपला अॅक्सेस करण्यासाठी पासवर्ड आवश्यक असेल. जो युजर्स आपल्या सोयीनुसार सेट करु शकतात.

पासवर्ड किमान 8 कॅरेक्टरचे आणि केस सेंसिटिव्ह असेल. पासवर्ड दिल्यानंतर चॅटचा बॅकअप घेतला जाऊ शकतो.व्हॉट्सअ‍ॅपने अद्याप या फिचरबाबत कोणतही माहिती दिली नाही. परंतु कंपनी गेल्या काही दिवसांपासून यावर काम करत आहे.

आता हे फीचर अंतिम टप्प्यात आहे आणि येत्या काळात कंपनी याबद्दल अधिकृत घोषणा करू शकते.दरम्यान, व्हॉट्सअॅप चॅट लीकमध्ये एका प्रसिद्ध टीव्ही अँकरचे नावही समोर आले आहे. त्याच्याविरोधात मुंबई पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले.

ज्यामध्ये व्हॉट्सअॅप चॅट लीकला आधारचा आधार बनविला गेला. व्हॉट्सअ‍ॅप चॅट लीकमधील टीआरपी घोटाळ्यात आपली भागिदारी असल्याचे त्याने कबूल केले. त्याशिवाय, त्या चॅट लीकवरून अनेक खुलासे झाले आहेत.