WhatsApp वर कोणाशी जास्त चॅटिंग करतोय तुमचा पार्टनर?, 'या' Trick वापरून शोधा...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2021 05:19 PM2021-07-17T17:19:21+5:302021-07-17T17:29:21+5:30

WhatsApp : व्हॉट्सअ‍ॅपच्या काही टिप्स आणि ट्रिक्स (Tips and Tricks) देखील आहेत, ज्याची बर्‍याच युजर्संना माहिती नाही. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला एक खास गोष्टी सांगणार आहोत.

व्हॉट्सअॅप (WhatsApp) हे जगातील सर्वाधिक लोकप्रिय अॅप आहे. युजर्संना हे खूप आवडते. यामुळे व्हॉट्सअॅप आपल्या युजर्संसाठी नव-नवीन फीचर्स देखील घेऊन येत असते, जेणेकरून त्यांना चॅटिंगचा आनंद घेता येईल.

व्हॉट्सअ‍ॅपच्या काही टिप्स आणि ट्रिक्स (Tips and Tricks) देखील आहेत, ज्याची बर्‍याच युजर्संना माहिती नाही. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला एक खास गोष्टी सांगणार आहोत.

तुमचा पार्टनर व्हॉट्सॲपवर कोणाशी जास्त गप्पा मारतो? असा तुम्हाला कधी असा प्रश्न पडला असेलच... आम्ही आज जी ट्रिक तुम्हाला सांगणार आहे, त्या ट्रिकच्या मदतीने तुमचा पार्टनर व्हॉट्सॲपवर कोणाशी सगळ्यात जास्त चॅटिंग करतो, हे तुम्हाला कळू शकणार आहे

याशिवाय, तुम्ही किती टेक्स मेसेज पाठवले आणि रिसिव्ह केले हेदेखील तुम्हाला समजणार आहे. तसेच, शेअर केलेल्या मीडिया फाईल्सबाबतही माहिती मिळू शकते (WhatsApp shared files).

याबरोबर, खास बाब म्हणजे कोणत्या कॉन्टॅक्ट सोबत झालेलं चॅटिंग तुमच्या फोनच्या स्टोरेजमधील अधिक जागा घेत आहे हेदेखील तुम्हाला या ट्रिकच्या मदतीने समजू शकेल. झी न्यूजने याबाबतची माहिती शेअर केली आहे.

चला तर जाणून घेऊया ही ट्रिक... सर्वात अगोदर व्हॉट्सॲप सुरू करा. यानंतर सेटिंग्ज टॅब उघडा. यामध्ये डेटा अँड स्टोरेज पर्याय निवडा. यामध्ये स्टोरेज यूसेज पर्यायावर क्लिक करा.

यानंतर तुम्हाला कॉन्टॅक्ट आणि चॅटची यादी दिसेल. या यादीमध्ये सगळ्यात जास्त स्टोरेज वापरणारं कॉन्टॅक्ट सगळ्यात वर दिसेल. या कॉन्टॅक्टवर क्लिक केल्यास तुम्हाला शेअर केलेल्या चॅटिंगची आणि मीडिया फाईल्सची माहिती मिळेल.

यातून मग तुम्हाला तुम्ही कोणाशी सर्वाधिक बोलत आहात, कोणासोबत तुम्ही सर्वाधिक मीडिया शेअर करत आहात याची सगळी माहिती मिळू शकेल.

तसेच, तुमच्या पार्टनरच्या फोनमध्ये ही ट्रिक वापरली, तर तुमचा पार्टनर कोणाशी सर्वाधिक बोलत आहे किंवा मीडिया शेअर करत आहे, हे देखील तुम्हाला आरामात कळू शकेल.

तुम्हाला कळालेली ही ट्रिक आपल्या पार्टनरसोबत मात्र शेअर करू नका, नाहीतर तुमचीच आयडिया तुमच्यावर वापरली जाण्याची शक्यता आहे.