काय सांगता? WhatsApp अकाऊंट डिलीट केल्यानंतरही 90 दिवसांपर्यंत धोका; कधीही लीक होऊ शकतं चॅट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2021 12:12 PM2021-01-15T12:12:40+5:302021-01-15T12:32:03+5:30

WhatsApp News : व्हॉट्सअ‍ॅपसंबंधित रोज नवनवीन माहिती ही समोर येत असून वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लोक मोठ्या प्रमाणात या नव्या पॉलिसीचा विरोध करताना पाहायला मिळत आहे.

व्हॉट्सअ‍ॅप हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम आहे. मात्र सध्या गेल्या कित्येक दिवसांपासून अनेकांना व्हॉट्सअ‍ॅपचा धसका घेतलेला पाहायला मिळत आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या पॉलिसीमुळे युजर्सच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.

व्हॉट्सअ‍ॅपसंबंधित रोज नवनवीन माहिती ही समोर येत असून वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लोक मोठ्या प्रमाणात या नव्या पॉलिसीचा विरोध करताना पाहायला मिळत आहे.

व्हॉट्सअ‍ॅपला पर्याय असलेल्या तसेच युजर्सच्या सुरक्षितच्या दृष्टीने योग्य असलेल्या आणि वापरायला अत्यंत सोप्या असलेल्या अ‍ॅपचा शोध सर्वच जण घेत आहे. नव्या पॉलिसीचा सर्वाधिक फटका हा त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅपलाच बसला आहे.

व्हॉट्सअ‍ॅपला मोठा झटका बसला असून टेलिग्राम, सिग्नलसारख्या अ‍ॅपचा वापर आता मोठ्या प्रमाणात केला जात आहे. हे अ‍ॅप डाऊनलोड करणाऱ्यांची तसेच वापरणाऱ्यांची संख्येत कमालीची वाढ झाली आहे.

व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या पॉलिसीबाबत युजर्समध्ये नाराजी असतानाच आता अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. व्हॉट्सअ‍ॅपचं अकाऊंट डिलीट केल्यानंतरही 90 दिवसांपर्यंत धोका असून चॅट लीक होऊ शकत असल्याची माहिती मिळत आहे.

काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअ‍ॅपने आपली नवी प्रायव्हसी पॉलिसी अपडेट केली आहे. ही नवी पॉलिसी आठ फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपने आणलेल्या नवा पॉलिसीमुळे सर्वांचीच चिंता वाढली आहे. अनेकांनी तर या नव्या पॉलिसीचा धसका घेतला आहे.

व्हॉट्सअ‍ॅपने युजर्संना पॉपअप मेसेज पाठवला आहे. यामध्ये युजर्संना नियम व अटीसोबत नव्या प्रायव्हसी पॉलिसीबाबत सांगितलं आहे. व्हॉट्सअ‍ॅप कशा पद्धतीने तुमचा डेटा यूज करणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या युजसाठी या नियम व अटीला अ‍ॅक्सेप्ट करावे लागणार आहे.

जर अ‍ॅक्सेप्ट केले नाही तर युजर्सचे अकाऊंट डिलीट केले जाईल असं मेसेजमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे अनेकांची चिंता वाढली आहे. काहींनी तर सुरक्षिततेच्या दृष्टीने व्हॉट्सअ‍ॅपचं अकाऊंटच डिलीट केलं आहे.

व्हॉट्सअ‍ॅपचे युजर्स आपला डेटा प्रायव्हेट ठेऊ इच्छित असल्यास, त्यांना अ‍ॅप अनइन्स्टॉल नाही, तर डिलीट करावं लागेल. जर अकाऊंट डिलीट केलं नाही, तर डेटा व्हॉट्सअ‍ॅपकडे राहील. तसेच अकाऊंट डिलीट केल्यानंतरही 90 दिवसांपर्यंत युजर्सचा डेटा व्हॉट्सअ‍ॅपकडे राहतो.

व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीमुळे युजर्स, दुसऱ्या मेसेजिंग अ‍ॅपकडे स्विच होत आहेत. त्यामुळे अनेकजण आपल्या फोनमधून व्हॉट्सअ‍ॅप थेट अनइन्स्टॉल करत आहेत. मात्र हा योग्य पर्याय नाही. दुसऱ्या अ‍ॅपवर स्विच होताना व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट डिलीट करणं आवश्यक आहे.

अँड्रॉईड युजर्सला व्हॉट्सअ‍ॅपचे अकाउंट डिलीट करण्यासाठी मेन स्क्रिनवर बाजूला दिलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर सेटिंग्समध्ये अकाऊंट ओपन करुन डिलीट माय अकाउंटवर क्लिक करावं.

फोन नंबर टाकावा लागेल आणि नंतर डिलीट माय अकाऊंटवर क्लिक करावं लागेल. यावेळी अकाऊंट डिलीट करण्याचं कारण विचारलं जाईल. यात कारण सांगून पुढील प्रोसेस होईल. एकदा अकाऊंट डिलीट झाल्यानंतरही 90 दिवसांपर्यंत व्हॉट्सअ‍ॅपकडे युजर्सचा डेटा राहतो.

व्हॉट्सअ‍ॅपच्या सर्व्हरवर ही माहिती राहणार आहे. जेणेकरुन इमर्जेंसीमध्ये बॅकअप घेतला जाऊ शकतो. व्हॉट्सअ‍ॅपने देखील आता आपल्या नव्या पॉलिसीबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

चीनी हॅकर्स भारतीय युजर्सना आपल्या जाळ्यात ओढत आहेत. व्हॉट्सअ‍ॅपसारखं लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप सध्या हॅकर्सच्या निशाण्यावर आलं आहे. पार्ट टाईम नोकऱ्यांचं आमिष दाखवून गंडा घालत असल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे.

दिल्लीतल्या थिंक टँक सायबरपीस फाऊंडेशनने याबाबत माहिती दिली आहे. भारतीय य़ुजर्सना व्हॉट्सअ‍ॅपवर विविध प्रकारचे मेसेज हे पाठवले जातात. ज्यामध्ये एक लिंक देखील देण्यात आलेली असते.

मेसेजमधील लिंक ओपन करताच एका दिवसात 10 ते 30 मिनिटं काम करून 200 ते 3000 रुपये कमवा असा मजकूर दिसतो. तसेच यासारखे पार्ट टाईम कामाशीसंबंधित दिशाभूल मेसेज पाठवले जातात आणि युजर्सना नोकरी आहे असं सांगून जाळ्यात ओढलं जातं आहे.