WhatsApp Pay या महिन्याच्या अखेरीस लाँच होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2020 03:05 PM2020-05-05T15:05:57+5:302020-05-05T15:35:29+5:30

भारतात गेल्या दोन वर्षांपासून WhatsApp Pay Beta उपलब्ध आहे. मात्र हे ऑफिशिअल लाँच करण्यात आले नाही. कारण, आतापर्यंत भारतात परवानगी मिळाली नाही. रिपोर्टनुसार, या महिन्याच्या अखेरपर्यंत WhatsApp Pay लाँच होण्याची शक्यता आहे.

याआधी अशी माहिती समोर आली होती की, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच NPCI ने WhatsApp Pay ला भारतात लाँच करण्यासाठी परवानगी दिली आहे. याला काही टप्प्यात लाँच केले जाईल.

मनी कंट्रोलच्या एक रिपोर्टमध्ये WhatsApp च्या या डेव्हलोपमेंटवर नजर ठेवणाऱ्या दोन बँकरच्या हवाल्यानुसार म्हटले आहे की, WhatsApp Pay या महिन्याच्या अखेरीस लाँच केले जाईल.

WhatsApp ने यासाठी भारतातील टॉप तीन बँकांसोबत भागिदारी केली आहे. यामध्ये आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक आणि एचडीएफसी बँकेचा समावेश आहे. रिपोर्टनुसार, पहिल्या टप्प्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया तयार नाही आहे.

मनी कंट्रोलला WhatsApp Payच्या प्रवक्त्याने सांगितले की, आम्ही सरकारसोबत सतत WhatsApp Payment सभी युजर्सला देण्यासाठी काम करत आहोत. WhatsApp Payment भारतात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 400 मिलियन युजर्सला सेफ ट्रान्जक्शन करण्यात मदत करु शकते.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी WhatsAppची मालकी असलेल्या फेसबुकने रिलायन्स इंडस्ट्रीजच्या रिलायन्स जिओमध्ये तब्बल 43 हजार 574 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे.

त्यामुळे WhatsApp आणि Jio मिळून एक सुपर अॅप लॉन्च करु शकतात. ज्यामध्ये पेमेंटचा ऑप्शन सुद्धा असण्याची शक्यता आहे.

सध्या जिओजवळ जिओ मनी अॅप आहे. मात्र, जर WhatsApp Pay आल्यानंतर WhatsApp आणि जिओ कसे एकत्र काम करणार, याबाबत अद्याप कोणतीच स्पष्टता नाही.