WhatsApp कडून iPhone युजर्सना गिफ्ट; अ‍ॅन्ड्रॉइडचं खास फिचर आता iOS वरही

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2019 04:02 PM2019-04-05T16:02:04+5:302019-04-05T16:06:43+5:30

व्हॉट्सअ‍ॅप नेहमीच आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर आणत असतं. यावेळी व्हॉट्सअ‍ॅपने आयफोन युजर्सना एक गिफ्ट दिलं आहे. आयफोन युजर्ससाठी व्हॉट्सअ‍ॅप बिझनेस अ‍ॅप आणलं आहे. त्यामुळे आता iPhone युजर्स WhatsApp च्या बिझनेस अ‍ॅपचा वापर करू शकतात.

WhatsApp ने आपलं Business App गेल्या वर्षी लाँच केलं आहे. व्यवसाय करणाऱ्या युजर्सची संख्या लक्षात घेत हे अ‍ॅप तयार करण्यात आले होते.

आपल्या आवडत्या डिवाईसवर व्हॉट्सअ‍ॅपच्या या अ‍ॅपचा वापर करता यावा असं अनेक छोटे व्यावसायिक म्हणत होते. त्या सर्वांना आता या अ‍ॅपचा वापर करता येईल असं व्हॉट्सअ‍ॅपने म्हटलं आहे.

WhatsApp च्या या Business App च्या माध्यमातून कंपन्या ग्राहकांशी संपर्क करू शकतात. तसेच लाखो युजर्स व्यावसायिकांशी संपर्क करू शकतात.

व्हॉट्सअ‍ॅप बिझनेस अ‍ॅप ब्राझील, जर्मनी, इंडोनेशिया, भारत, मेक्सिको, ब्रिटनमध्ये अ‍ॅप स्टोरवरून फ्रीमध्ये डाऊनलोडसाठी उपलब्ध आहे. तसेच त्यानंतर दूसऱ्या देशामध्येही हे उपलब्ध होणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप बिझनेस अ‍ॅप हे अ‍ॅन्ड्रॉईड व्हर्जनप्रमाणे अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोरवरून फ्री डाऊनलोड करता येईल. यामध्ये ग्राहकांना व्यावसायिकांशी संपर्क साधणं सोपं जावं यासाठी अनेक फीचर्स असणार आहेत.

व्हॉट्सअ‍ॅपचे बिझनेस अ‍ॅप हे छोट्या मोठ्या व्यावसायिकांसाठी अत्यंत फायदेशीर आहे.