फीचर्स पाहून तुटून पडाल; नवीन फोन घेण्याआधी या आठवड्यात येणाऱ्या ‘या’ फाडू स्मार्टफोन्सची यादी पाहा

By सिद्धेश जाधव | Published: May 16, 2022 09:05 AM2022-05-16T09:05:50+5:302022-05-16T09:17:38+5:30

या आठवड्यात अनेक स्मार्टफोन्स बाजारात येणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही नवीन स्मरफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर या फोन्सच्या यादीवर एक नजर नक्की टाका.

मे महिन्यात OnePlus, Oppo, Realme, iQOO आणि Vivo आपले काही स्मार्टफोन्स बाजारात सादर करणार आहेत. यातील काही डिवाइस चीनमध्ये, काही युरोपात तर काही भारतात सादर केले जाणार आहेत. जागतिक बाजारात लाँच झालेले स्मार्टफोन्स देखील लवकरच देशात देखील येतील. त्यामुळे फीचर्स आवडल्यास तुम्ही या फोन्ससाठी थांबू शकता.

iQOO Neo 6 स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच केला जाऊ शकतो. हा फोन 80W फास्ट चार्जिंग, स्नॅपड्रॅगन 870 चिपसेट, 120Hz रिफ्रेश रेट, 64MP ट्रिपल रियर कॅमेरा, आणि 4,700mAh च्या बॅटरीसह येईल.

Realme Narzo 50 5G सीरीज 18 मेला लाँच केली जाईल, अशी घोषणा कंपनीनं केली आहे. यात Realme Narzo 50 5G आणि Narzo 50 Pro 5G असे दोन हँडसेट ग्राहकांच्या भेटीला येतील. यातील प्रो मॉडेलमध्ये MediaTek Dimensity 920 SoC तर स्टँडर्ड मॉडेलमध्ये Dimensity 810 SoC मिळेल. सोबत AMOLED पॅनल आणि 5,000mAh ची बॅटरी 33W फास्ट चार्जिंगसह मिळू शकते.

भारतात आलेला OnePlus 10R स्मार्टफोन चीनमध्ये रीब्रँड करून OnePlus Ace Racing Edition नावानं सादर केला जाऊ शकतो. चीनमध्ये 17 मेला हा फोन Dimensity 8100 Max चिपसेट, 12GB रॅम आणि 64MP ट्रिपल कॅमेऱ्यासह लाँच होऊ शकतो.

विवो भारतात 18 मेला आपली नवीन फ्लॅगशिप विवो एक्स80 सीरीज सादर करणार आहे. या सीरिजमधील विवो एक्स80 आणि एक्स80 प्रो स्मार्टफोन चीनमध्ये लाँच झाले आहेत. हँडसेटमध्ये 120Hz रिफ्रेश रेट, स्नॅपड्रॅगन 8 जेन 1 चिपसेट आणि 12GB रॅम असे दमदार स्पेक्स मिळतील, परंतु यांची खासियत जिम्बल स्टॅबिलायजेशनसह येणारी कॅमेरा सिस्टम असेल.

OnePlus Nord 2T स्मार्टफोन युरोपात Dimensity 1300 SoC, 4500mAh बॅटरी, 80W फास्ट चार्जिंग आणि 50MP कॅमेऱ्यासह आला आहे. हा फोन 19 मेला भारतात सादर केला जाऊ शकतो. हा फोन 35,000 रुपयांच्या बजेटमध्ये सादर केला जाऊ शकतो.