फक्त गुगलचं नाही दमदार; 'ही' सर्च इंजिनही शानदार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 02:54 PM2019-02-13T14:54:28+5:302019-02-13T15:11:34+5:30

गुगलवर एखादी गोष्ट सर्च केल्यावर त्यासंबंधीचे असंख्य रिझल्ट मिळतात. गुगलवर मार्स प्लॅनेट सर्च केल्यास त्याचा उल्लेख असलेली सर्व माहिती अगदी सहज मिळते. तसेच गुगलला युजर्सची वैयक्तिक माहिती ही समजते. जी-मेल आणि इतर माध्यमातून गुगल ती माहिती गोळा करतं. इतकंच नाही तर गुगलवर my flights किंवा my trips सर्च केलं तर प्रवासासंदर्भातील सर्व माहिती मिळते.

बिंग हे सर्च इंजिन गुगलप्रमाणेच आहे. या सर्च इंजिनची खासियत म्हणजे हे व्हिडीओ आणि फोटो सर्चची विशेष सुविधा देते. बिंगच्या रिझल्ट पेजवर फिल्टर्सचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तसेच डिस्प्ले इंटरफेस चांगला असून तुमच्या सर्चशी संबंधित अनेक गोष्टींबाबत सल्ला दिला जातो.

फ्लिकर एक लोकप्रिय सर्च इंजिन आहे. फ्लिकरवर एखाद्या फोटोचा वापर दोन वेळा मोफत करायला मिळतो. तसेच एखाद्या विषयासंबंधीचे असंख्य उत्तम फोटो तेथे मिळतात. त्या फोटोचा वापर करता येतो.

Wolfram Alpha या सर्च इंजिनवर विज्ञान आणि गणित विषयक अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतात. केमिस्ट्री संदर्भात एखादा फॉर्मुला सर्च केला तर त्याबाबत सर्व माहिती मिळते. तसेच गणिताविषयी देखील बरीच माहिती येथे उपलब्ध होते.

लिंक्डइन हे प्रोफेशनल नेटवर्क मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे. लिंक्डइनवर व्हॉईस एसएमएस पाठविण्याची सुविधा देण्यात आली असून हे फिचर जगभरातील युजर्सला वापरता येणार आहे. मायक्रोसॉफ्टने हे खरेदी केले असून यात नवनवीन फिचर्स देण्यात येत आहेत. इतर सर्च इंजिनवर नोकरी शोधता येते. मात्र नोकरीसाठी लिंक्डइन खास तयार करण्यात आले आहे.