#BestOf2018 : वर्षभर 'हे' स्मार्टफोन फिचर्स राहिले ट्रेंडमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 04:10 PM2018-12-25T16:10:46+5:302018-12-25T16:41:34+5:30

स्मार्टफोन हा प्रत्येकाच्या जगण्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे. अनेक स्मार्टफोन तयार करणाऱ्या कंपन्या युजर्ससाठी फोनमध्ये नवनवीन फीचर्स घेऊन येत असतात. सुरुवातीला फोन म्हणजे केवळ संवाद साधण्याचं एक माध्यम होतं. मात्र आता तंत्रज्ञानाच्या मदतीने अशक्य वाटणाऱ्या अनेक गोष्टी अगदी सहज शक्य झाल्या आहेत. 2018 या वर्षभरात स्मार्टफोनमध्ये अनेक भन्नाट ट्रेंड पाहायला मिळाले अशाच काही ट्रेंड्सबाबत जाणून घेऊया.

BEZEL-LESS DISPLAY : BEZEL-LESS DISPLAY हा सध्याचा स्मार्टफोनमधील अत्यंत महत्त्वाचा ट्रेंड आहे. या technology मध्ये manufractures स्मार्टफोनच्या Edges चारही बाजूंनी trim करतात. ज्यामुळे स्मार्टफोनची स्क्रीन साईज थोडी मोठी आणि छान वाटते. Xiaomi ने Mi Mix या नावाचा स्मार्टफोन लाँच केल्यानंतर BEZEL-LESS DISPLAY एक ट्रेंड झाला आहे.

18:9 ASPECT RATIO : स्मार्टफोनचा डिस्प्ले अधिक विकसित करण्यासाठी अनेक नव्या गोष्टी करण्यात येत आहेत. आतापर्यंत 16:9 aspect ratio मध्ये सर्व स्मार्टफोन उपलब्ध होते. तसेच हा एक आदर्श Ratio मानला जातो. मात्र आता स्मार्टफोनमध्ये 18:9 Aspect Ratio चा ट्रेंड आला आहे. स्मार्टफोन तयार करणाऱ्या कंपन्या एकमेकांपेक्षा अधिक सरस ठरण्यासाठी अशाप्रकारच्या नवनवीन गोष्टी युजर्ससाठी आणत आहेत.

SUPER AMOLED DISPLAYS : TFT displays, IPS LCD display आणि AMOLED display नंतर आता Super AMOLED ही नवीन technology आली आहे. या technology मुळे color reproduction, fast response time, viewing angles, brightness, battery life आणि Light weight design या सर्व गोष्टी अधिक उत्तम होणार आहेत. त्यामुळेच Super AMOLED Display असलेल्या स्मार्टफोनला अत्यंत मागणी आहे.

IN-SCREEN FINGERPRINT SENSOR : California च्या Synaptics या कंपनीने In-Screen Fingerprint Sensor चा शोध लावला. ही Technology Samsung आणि Apple ने सर्वप्रथम आणली. त्यानंतर इतर स्मार्टफोन कंपन्यांनी Technology आत्मसात केली. आता In-Screen Fingerprint Sensor Technology हा एक महत्त्वाचा ट्रेंड आहे.

COPYING THE NOTCH : Apple ने iPhone X मध्ये notch invent केल्यानंतर notch copy करण्याचा एक ट्रेंड आला आहे. iPhone X चा डिस्प्ले पाहिल्यास वर screen inserter दिसेल त्यामध्ये Apple ने स्मार्टफोनचा कॅमेरा सेक्शन insert केला आहे. तसेच या सेक्शनमध्ये front camera आणि face detection sensor आहे. आता अनेक स्मार्टफोनमध्ये notch आहे.

FACE DETECTION UNLOCK FEATURE : iPhone X मध्ये Face Detection Unlock Feature अॅड करण्यात आले होते. मात्र Notch प्रमाणेच Face Detection Unlock Feature इतर स्मार्टफोन तयार करणाऱ्या कंपन्यांनी कॉपी केले. त्यामुळेच आता अनेक स्मार्टफोनमध्ये हे फीचर असून सध्या त्याचा ट्रेंड पाहायला मिळत आहे.

DUAL CAMERA : स्मार्टफोन घेताना आता सर्वप्रथम त्याचा कॅमेरा पाहीला जातो. सध्या तरुणाईमध्ये selfieची क्रेझ असल्याने उत्तम कॅमेरा असलेल्या स्मार्टफोनला अधिक मागणी आहे. 16MP, 20MP आणि 24MP चे कॅमेरे असतात. DUAL CAMERA अनेक स्मार्टफोनमध्ये उपलब्ध आहे. Rear Dual Camera नंतर Front Dual Camera असलेले स्मार्टफोन लाँच झाले आहे. त्यामुळे DUAL CAMERA हा एक ट्रेंड आहे.

HYBRID SIM SLOT : Modern Technology मध्ये HYBRID SIM SLOT हा ट्रेंड पाहायला मिळतो. सुरुवातीला स्मार्टफोनमध्ये सिमकार्डसाठी फोनच्या मागे एक वेगळा Slot दिला जात असे. मात्र आता अनेक स्मार्टफोनमध्ये non-removable battery असते. त्यामुळे आता स्मार्टफोनच्या एका बाजूला सिमकार्ड आणि मेमरी कार्डसाठी 2-in-1 slot असतो. त्यालाच Hybrid SIM slot म्हटलं जातं.

NO HEADPHONE JACK : स्मार्टफोनचा Thickness ही महत्त्वपूर्ण गोष्ट असल्यामुळे अनेक Manufacturers आपल्या स्मार्टफोनमधून 3.5 mm Headphone Jack काढत आहेत. त्या ऐवजी purchased box मध्ये एक 3.5mm चा Headphone Adapter मिळतो. त्याच्या माध्यमातून Headphones attach करता येतात. त्यामुळे NO HEADPHONE JACK ट्रेडींग लिस्टमध्ये आहे.

NO HOME BUTTON : HEADPHONE JACK नंतर आता Physical Home Button ही अनेक स्मार्टफोनमधून काढून टाकण्यात आले आहे. त्याजागी स्क्रीनवर Virtual Home Button देण्यात आले आहे. त्यामुळेच सध्या NO HOME BUTTON हे ट्रेंडमध्ये आहे.