‘या’ छोट्याश्या कंपनीनं दिला शाओमीला धक्का देत मिळवला सर्वात वेगवान स्मार्टफोनचा मान

By सिद्धेश जाधव | Published: May 13, 2022 06:54 PM2022-05-13T18:54:29+5:302022-05-13T19:18:20+5:30

पावरफुल स्मार्टफोन ओळखण्यासाठी AnTuTu बेंचमार्किंग स्कोर्स वापरता येतात. दर महिन्याला सर्वात वेगवान स्मार्टफोन्सची यादी बदलत राहते. पुढे आम्ही एप्रिल 2022 मधील टॉप 10 अँड्रॉइड स्मार्टफोन्सची यादी दिली आहे. विशेष म्हणजे मार्चमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेला शाओमीचा फ्लॅगशिप तिसऱ्या स्थानावर गेला आहे.

nubia Red Magic 7 स्मार्टफोन फेब्रुवारीमध्ये लाँच झाला आहे. या स्मार्टफोननं एप्रिल महिन्यात AnTuTu बेंचमार्किंगवर सर्वाधिक 10,38,771 पॉईंट्स मिळवले आहेत. हा फोन वेगवान Qualcomm Snapdragon 8 Gen1 चिपसेट, 18GB RAM आणि 256GB स्टोरेजसह बाजारात आला आहे.

Redmi K50 Pro ची टॉप टेनमध्ये नव्यानं एंट्री झाली आहे. या फोनच्या 8GB रॅम व 128GB स्टोरेज मॉडेलनं टेस्टमध्ये 9,86,840 पॉईंट्स मिळवले आहेत. या फोनमध्ये MediaTek Dimensity 9000 चिपसेट मिळतो. त्याचबरोबर 6.67-इंचाचा 2K OLED डिस्प्ले आणि 120Hz रिफ्रेश रेट देखील आहे.

Xiaomi 12 Pro स्मार्टफोन मार्च महिन्यात पहिल्या स्थानावर होता. यात 12GB RAM आणि 256GB स्टोरेज मिळते. Xiaomi 12 Pro ला Qualcomm Snapdragon 8 Gen 1 SoC कडून पावर मिळते. हा फोन भारतात लाँच झाला आहे.

Motorola Edge 30 Pro स्मार्टफोनला 9,77,395 पॉईंट्स मिळाले आहेत. टॉपला दोन नवीन डिवाइस आल्यामुळे ही घसरण झाली आहे. Motorola Edge 30 Pro हा जगातील पहिला स्मार्टफोन आहे ज्यात Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर देण्यात आला होता. फोनमध्ये 12GB RAM आणि 256GB स्टोरेज मिळते. हा फोन भारतात उपलब्ध आहे.

Realme’s GT 2 Pro स्मार्टफोन Snapdragon 8 Gen 1 चिपसेटसह काही दिवसांपूर्वी भारतात आला आहे. 12GB RAM आणि 256GB स्टोरेज असलेल्या हा डिवाइस कंपनीचा सर्वात प्रीमियम स्मार्टफोन आहे.

iQOO 9 Pro देखील एप्रिलमध्ये टॉप 10 स्मार्टफोनमध्ये आला आहे. या डिवाइसला टेस्टमध्ये 9,54,336 पॉईंट्स मिळाले आहेत. हा फोन Qualcomm Snapdragon 8 Gen1 चिपसेटसह भारतात उपलब्ध आहे. तसेच यात 6.78-इंचाचा क्वॉड एचडी+ कर्व E5 LTPO AMOLED डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे.

या यादीतील हा तिसरा शाओमी डिवाइस आहे. Xiaomi 12च्या 8GB/256GB व्हेरिएंटनं 9,48,391 पॉईंट्स मिळवले आहेत. या मोबाईलमध्ये Snapdragon 8 Gen 1 चिपसेट, 8GB RAM आणि 128GB स्टोरेज मिळते. हा फोन लवकरच भारतात येऊ शकतो.

Samsung Galaxy S22 Ulta स्मार्टफोन Snapdragon 8 Gen 1 चिपसेटसह भारतात आला आहे. गेल्या महिन्यात हा डिवाइस पाचव्या क्रमांकावर होता. विशेष म्हणजे यात Snapdragon 8 Gen1 चिपसेट, 12GB रॅम आणि 1TB स्टोरेज मिळते. हा फोन 108MP कॅमेऱ्यासह बाजारात आला आहे.

Galaxy S22 Plus मध्ये Galaxy S22 Ultra सारखेच फीचर्स आहेत परंतु यात छोटा डिस्प्ले आणि कमी बॅटरी देण्यात आली आहे. फोनमध्ये 6.6-इंचाचा FHD+ डायनॅमिक अ‍ॅमोलेड डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. तसेच यातील 4,500mAh ची बॅटरी 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.