लूक अन् डिझाइनमध्ये 'हे' फोन होते भारी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 11:51 AM2019-03-19T11:51:44+5:302019-03-19T12:26:10+5:30

स्मार्टफोन हा प्रत्येकाच्याच जगण्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे. विविध फीचर्स असलेले आकर्षक आणि दमदार स्मार्टफोन लाँच होत असतात. काही कंपन्या फोल्डेबल फोन लाँच करण्याच्या तयारीत आहे, तर काही पोर्टलेस फोन लाँच करण्याची तयारी करत आहेत. मात्र पूर्वीच्या काळी देखील असेच काही हटके स्मार्टफोन होते. फोनच्या डिझाइनमुळे त्या काळी ग्राहकांनी या फोन्सना अधिक पसंती दिली होती. अशाच काही हटके फोनबाबत जाणून घेऊया.

मोटोरोला फ्लिपआउट हा स्कवेअर डिझाइनचा फोन असून 2.8 इंचाची स्क्रीन होती. या फोनमध्ये 3G आणि वाय-फाय सपोर्टही देण्यात आला होता. टायपिंगसाठी फोनमध्ये क्वर्टी कीपॅड दिले होते, जे फ्लिप करून उघडत होते. याची किंमत जवळपास 8000 रुपये होती.

सॅमसंग ज्यूक या फोनचा लूक हा एमपी3 प्लेअरसारखा होता. हा फोन वजनाने खूपच हलका असून फोनमध्ये किपॅड उघडल्यानंतर फोन पूर्ण रुपात येत होता. 4000 रुपये किमतीच्या या फोनलाही ग्राहकांनी अधिक पसंती दिली होती.

नोकियाने 7280 हा फोन आपल्या फॅशन सीरीजमध्ये लाँच केला होता. 84 ग्रॅम वजनाच्या या फोनमध्ये 0.3 एमपीचा कॅमेरा देण्यात आला होता. स्क्रीन ऑफ केल्यानंतर ती आरशासारखी दिसत असे.

नोकियाच्या फॅशन सीरीजचा नोकिया 7600 हा फोन आपल्या खास डिझाइनमुळे चर्चेत राहिला. टियर ड्रॉप आकाराचा हा फोन दोन्ही हातांनी वापरण्यासाठी तयार केला होता. या फोनमध्ये टेक्स्ट टाइप करणे अवघड होत होते.

नोकियाचा हा फोन गेम खेळण्याची आवड असलेल्यांना लक्षात ठेवून तयार करण्यात आला होता. गेमिंग कन्सोलसारखा दिसणाऱ्या या फोनला तरुणांनी अधिक पसंती दिली होती. नोकिया एन-गेजचा गेमिंग अनुभवही चांगला होता.

नोकियाचा हा फोन कम्युनिकेटर म्हणून लोकप्रिय झाला होता. हा फोन आपल्याकडे असणं हे एकेकाळी स्टेट्स सिम्बॉल मानले जात होतं. 2000 साली हा फोन लाँच झाला होता. क्वार्टी किपॅडसह येणाऱ्या या फोनमध्ये आतल्या बाजूला एक मोठी स्क्रीन आणि बाहेरच्या बाजूस एक छोटी स्क्रीन देण्यात आली होती.

सीमेन्स जेलिब्री 6 हा फोन तरुणींसाठी खास डिझाईन करण्यात आला होता. फोनमध्ये टी 9 किपॅड, चार बटण नॅव्हिगेशनसह दोन आरसे देण्यात आले होते. जेम्स बॉन्डच्या चित्रपटात हा फोन दाखविण्यात आला होता.

2013 मध्ये सॅमसंगने कर्व स्क्रीन असलेला आपला पहिला फोन गॅलेक्सी राउंड लाँच केला होता. फोनचे डिझाईन ग्राहकांच्या चांगलेच पसंतीस उतरले होते. फोनमध्ये 13 मेगापिक्सलचा कॅमेराही देण्यात आला होता.

ट्विनबाइज एम5 कार्ड फोनची साइझ फक्त एका छोट्या क्रेडिट कार्डसारखी होती. OLED डिस्प्ले असलेला हा 2G सर्व फीचर्सला सपोर्ट करणारा होता. 320mAh ची बॅटरी 72 ते 96 तास बॅकअप देते.