5G ला विसरा; सॅमसंग आता 6G Technology आणण्याच्या तयारीत, मिळणार ५० टक्के अधिक स्पीड

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 11:00 AM2021-06-24T11:00:52+5:302021-06-24T11:07:17+5:30

6G Technology Samsung : सध्या देशातील दूरसंचार कंपन्यांकडून सुरू आहे 5G ची चाचणी. काही देशांमध्ये सुरूये 6G आणण्याची तयारी.

6G Technology Latest Update: 4G आणि 5G तंत्रज्ञानानंतर आता अनेक देश 6G तंत्रज्ञान आणण्याची तयारी करत आहेत. यादरम्यान, दक्षिण कोरियाची टेक कंपनी सॅमसंगनं (Samsung) नुकताच 5G च्या तुलनेत 50 टक्के अधिक स्पीड मिळवला असल्याचा दावा केला आहे.

कंपनीनं 5G ट्रान्समिशन उपकरणांवर सादरीकरण करताना सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचे सीनिअर प्रेसिडेंट, प्रोडक्ट स्ट्रॅटजीचे हेड, नेटवर्क बिझनेस, वोनिल रोह यांनी सांगितलं की, कंपनीनं 5G नेटवर्कवर 5.23 गेगाबाइट प्रति सेकंदचा स्पीड मिळाला आहे.

"6G निरनिराळ्या तंत्रज्ञानांसोबत संधीदेखील प्रदान करेल आणि सेवांच्या मॉडेलला पूर्ण आकार मिळेल. आम्ही वास्तवात 6G आणण्यासाठी उत्सुक आहोत," असं मत सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स नेटवर्क बिझनेस SVP सुंगयुन चोई यांनी व्यक्त केलं.

खऱ्या अर्थानं आम्ही यापूर्वीच टेरा हर्ट्झचं सादरीकरण केलं होतं, जे 6G शी निगडीत आमची प्रगती दाखवतं, असंही ते म्हणाले.

प्रेझेन्टेशन स्लाईडमध्ये सांगताना सॅमसंगनं 5G च्या तुलनेत 6G जी 50 टक्के अधिक वेगवान असल्याचं सांगितलं.

6G चं स्टँडर्ड पूर्ण होणं आणि त्याचं लवकरच कमर्शिअलायझेशन हे 2028 पर्यंत होऊ शकतं. मोठ्या प्रमाणात कमर्शिअलायझेशन होण्यास 2030 पर्यंतचा कालावधी लागू शकतो.

"कंपनी कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, व्हिज्युअल तंत्रज्ञान आणि भविष्यातील तंत्रज्ञानासाठी सुरक्षिततेच्या नवीन क्षेत्रांचा शोध घेत आहोत," असं चोई म्हणाले.

XR हा शब्द ऑगमेंटेड रिअलिटी, व्हर्च्युअल रिअलिटी आणि मिक्स्ड रिअलिटीला जोडतो, जो मनोरंजन, आरोग्य, विज्ञान, शिक्षण आणि उत्पादन क्षेत्रांच्या मर्यादा पुढे नेत अधिक प्रगत केल्या आहेत, असंही ते म्हणाले.

मिळालेल्या माहितीनुसार कंपनीनं आपल्या नेटवर्क ऑपरेशनला सोपं करण्यासाठी आपल्या अनेक सिस्टमचं व्हर्च्युअलायझेशन केलं आहे.

आम्ही भारातात जगातील सर्वात मोठ्या व्हर्च्युअलाईज्ड कोअर नेटवर्कचं संचालन करतो, याची क्षमता कोट्यवधी ग्राहकांना सपोर्ट पुरवण्याची आहे, असं सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स नेटवर्क बिझनेस EVP, ग्लोबल सेल्स अँड मार्केटिंग हे़ड वाजून किम यांनी सांगितलं.