देशातील पहिला 64 मेगापिक्सल कॅमेराचा फोन Realme XT लाँच

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 11:51 AM2019-09-16T11:51:03+5:302019-09-16T11:58:09+5:30

ओप्पोची उपकंपनी Realme ने चीनचीच कंपनी शाओमीवर कुरघोडी केली आहे. शाओमीच्या फोनच्या एक महिना आधीच रिअलमीने 64 मेगापिक्सलचा दमदार कॅमेरा असलेला फोन लाँच केला आहे. हा फोन तीन स्टोरेजमध्ये लाँच केला असून किंमतही माफक ठेवण्यात आली आहे.

या सोबत कंपनीने Realme Buds Wireless आणि 10 हजार एमएएचची पावर बँकही लाँच केली आहे. हा फोन आजपासून फ्लिपकार्टवर दुपारी 12 वाजल्यापासून उपलब्ध होणार आहे.

Realme XT हा फोन 4GB + 64GB 15999 रुपयांत, 6GB + 64GB 16999 आणि 8GB + 128GB मॉडेलची किंमत 18,999 रुपये एवढी ठेवण्यात आली आहे. लाँचिंग ऑफरमध्ये फोनच्या सुपर अमोल्ड डिस्प्लेसाठी 6 महिन्यांची स्क्रीन रिप्लेसमेंट देण्यात येणार आहे.

रिअलमी एक्सटीमध्ये ड्यूड्रॉप स्टाईलसोबत 6.4 इंचाचा सुपर अमोल्ड डिसप्ले देण्यात आला आहे. यामध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरही आहे.

फोनमध्ये Qualcomm Snapdragon 712 AIE प्रोसेसर असून फोनमध्ये दोन सिम कार्ड आणि मायक्रोएसडी कार्ड एकावेळी वापरता येते.

हा फोन फोटोग्राफीसाठी बनविण्यात आला आहे. कारण सध्याचा लेटेस्ट कॅमेरा सॅमसंगचा 64 मेगापिक्सलचा आहे. या फोनमध्ये चार रिअर कॅमेरा देण्यात आले आहेत.

8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल सेन्सर, 2 मेगापिक्सलची मायक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे.

याशिवाय व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी सोनीचा Sony IMX 471 sensor सोबत 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

या फोनमध्ये दोन्ही बाजुला कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 देण्यात आली आहे.

VOOC 3.0 फास्ट चार्जिंग देण्यात आले आहे. 4000 एमएएचची बॅटरी एक ते सव्वा तासात फूल चार्ज होते. अँड्रॉईड 9 पाय ही ऑपरेटिंग सिस्टिम देण्यात आली आहे.