Pegasus : एका व्यक्तीच्या हेरगिरीसाठी किती आहे खर्च? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 07:31 PM2021-07-19T19:31:57+5:302021-07-19T19:41:55+5:30

Pegasus : हे एक अतिशय अॅडव्हान्स आणि पॉवरफूल टूल आहे.

Pegasus स्पायवेअर पुन्हा चर्चेत आले आहे. रिपोर्टनुसार, Pegasus चा वापर करुन पत्रकार, कार्यकर्त्यांवर नजर ठेवली जात आहे. त्यामुळे आता Pegasus हे काय आहे आणि ते कसे वापरावे याबद्दल बर्‍याच लोकांना जाणून घ्यायचे आहे.

Pegasus ला इस्त्रायली सर्विलांस कंपनी NSO Group ने विकसित केले आहे. हे एक स्पायवेअर आहे. म्हणजेच याचा उपयोग कोणाच्याही हेरगिरीसाठी करता येईल. हे ऑनलाइन मिळणाऱ्या रँडम स्पायवेअरसारखे नाही. हे एक अतिशय अॅडव्हान्स आणि पॉवरफूल टूल आहे.

हे टूल प्रत्येकजण विकत घेऊ शकत नाही. हे फक्त सरकारबरोबर काम करते असा कंपनीचा दावा आहे. याचा वापर मॅक्सिको आणि पनामा या सरकारांकडून केला जात आहे. ही गोष्ट सार्वजनिक क्षेत्रात आहे. रिपोर्टनुसार, या टूलचे 40 देशांमधील 60 ग्राहक आहेत.

कंपनीने असे म्हटले आहे की, त्यांच्या युजर्सपैकी 51 टक्के लोक इंटेलिजेंट एजन्सी, 38 टक्के लोक लॉ इनफोर्समेंट आणि 11 टक्के लोक लष्करातील आहेत. कंपनीने वेबसाइटवर लिहिले आहे की, दहशतवाद आणि गुन्हांचा तपास करण्यासाठी हे मदत करते.

कंपनीच्या म्हणण्यानुसार, NSO केवळ Pegasusला सार्वभौम राज्य, राज्य एजन्सीचा परवाना देते. हे Pegasus ऑपरेट करत नाही. हे त्याच्या वापरामध्ये व्यत्यय आणत नाही किंवा ग्राहकांची माहिती संकलित करत नाही. हे एक मास सर्विलांस टेक्नोलॉजी नाही. हे स्पेसिफिक मोबाइल डिव्हाइसमधूनच डेटा कलेक्ट करते.

एका रिपोर्टनुसार, Pegasus स्पायवेअर परवाना (लायसन्स) स्वरूपात विकले जाते. त्याची किंमत त्याच्या करारावर अवलंबून असते. परवान्यासाठी 70 लाखांपर्यंत खर्च करावा लागतो. एका परवान्यामुळे अनेक स्मार्टफोन्सला ट्रॅक केले जाऊ शकते.

रिपोर्टमध्ये असे सांगितले आहे की, 2016 च्या अंदाजानुसार NSO Group ने केवळ १० लोकांवर नजर ठेवण्यासाठी जवळपास 9 कोटी रुपये आकारले होते. 2016 च्या प्राइस लिस्टनुसार, NSO Group ने आपल्या ग्राहकांकडून 10 डिव्हाईस हॅक करण्यासाठी 6,50,000 डॉलर्स (सुमारे 4.84 कोटी रुपये) घेते. तसेच, त्याच्या इंल्टॉलेशनसाठी 500,000 (सुमारे 3.75 कोटी रुपये) द्यावे लागतात.

या टूलच्या मदतीने हल्लेखोर SMS, कॉन्टॅक्ट डिटेल्स, कॉल हिस्ट्री, कॅलेंडर रिकॉर्ड्स, ईमेल्स, इंस्टंट मेसेजिंग अॅप और ब्राउजिंग हिस्ट्रीबद्दल माहिती मिळवू शकतात.

NSO Groupच्या उत्पादनाच्या माहितीपत्रकानुसार, Pegasus गुपचुप फोटो क्लिक करण्याशिवाय कॉल रेकॉर्ड, आसपासचे आवाज रेकॉर्ड करू शकेल आणि युजर्सच्या माहितीशिवाय स्क्रीनशॉट घेऊ शकेल.

हे काम पूर्ण झाल्यावर ते स्वत:लाच संपवते. हे Android, iOS, Windows Phone, BlackBerry, Symbian आणि Tizen या सर्व ऑपरेटिंग सिस्टमवर काम करू शकते. याला इंस्टॉल करण्यासाठी एका लिंकवर करावे लागते. लिंकशिवाय सुद्धा एकाद्या व्यक्तीच्या फोनमध्ये मिस कॉल किंवा व्हॉट्सअॅप कॉलद्वारे इंस्टॉल केले जाऊ शकते.