जबरदस्त ऑफर! १३ हजारांचा स्मार्टफोन केवळ ७९० रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी

By देवेश फडके | Published: February 19, 2021 03:20 PM2021-02-19T15:20:28+5:302021-02-19T15:30:02+5:30

ई-कॉमर्स क्षेत्रात आघाडीवर असलेल्या अॅमेझॉनवर जबरदस्त ऑफर सुरू आहे. Oppo Fantastic Days ऑफर अंतर्गत ओप्पो कंपनीच्या स्मार्टफोन्सवर भरघोस सूट देण्यात आली आहे. यामध्ये १३ हजार रुपयांचा ओप्पो स्मार्टफोन केवळ ७९० रुपयांमध्ये खरेदी करण्याची सुवर्ण संधी ग्राहकांना आहे.

नवी दिल्ली : ई-कॉमर्स क्षेत्रात आघाडीवर असलेल्या अॅमेझॉनवर जबरदस्त ऑफर सुरू आहे. Oppo Fantastic Days ऑफर अंतर्गत ओप्पो कंपनीच्या स्मार्टफोन्सवर भरघोस सूट देण्यात आली आहे. यामध्ये १३ हजार रुपयांचा ओप्पो स्मार्टफोन केवळ ७९० रुपयांमध्ये खरेदी करण्याची सुवर्ण संधी ग्राहकांना आहे. (oppo fantastic days on amazon know about deals offers and discounts on smartphones)

Oppo Fantastic Days या योजनेत ओप्पोच्या अनेक स्मार्टफोन्सवर मोठा डिस्काउंट दिला जात आहे. HDFC, ICICI क्रेडिट व डेबिट, SBI डेबिट कार्डवर इंस्टंट डिस्काउंट ऑफर केला जातोय.

अॅमेझॉनवरून ओप्पोच्या योजनेअंतर्गत जुना फोन एक्सजेंच करण्याचा विचार असेल, तरीही बेस्ट ऑफर दिल्या जात आहेत. तसेच या सेलमध्ये नो कॉस्ट ईएमआयवरही स्मार्टफोन खरेदीची संधी आहे.

Oppo A52 हा स्मार्टफोन १९ हजार ९९० रुपयांच्या किंमतीऐवजी १४ हजार ९९० रुपयांत उपलब्ध करून देण्यात आला आहे. या स्मार्टफोनवर ५ हजार रुपयांचा फ्लॅट डिस्काउंट दिला जात असून, १२ हजार ४०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर दिला जात आहे.

Oppo A52 स्मार्टफोन खरेदी करताना जुना फोन एक्सचेंज केल्यास हा स्मार्टफोन केवळ २ हजार ४९० रुपयांमध्ये खरेदी करता येऊ शकेल. या स्मार्टफोनमध्ये ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज आहे.

OPPO Reno5 Pro 5G हा स्मार्टफोन ३८ हजार ९९० रुपयांऐवजी ३५ हजार ९९० रुपयांत खरेदी करता येऊ शकतो. हा स्मार्टफोनवर ३ हजार रुपयांचा फ्लॅट डिस्काउंट ऑफर केला जात असून, १२ हजार ४०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर दिला जात आहे. हा स्मार्टफोन ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजसह उपलब्ध आहे.

OPPO A31 हा स्मार्टफोन १२ हजार ९९० रुपयांऐवजी १० हजार ९९० रुपयांमध्ये ऑफर केला जात आहे. तसेच २ हजार रुपयांचा फ्लॅट डिस्काउंटही दिला जात आहे.

OPPO A31 हा स्मार्टफोन ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजसह उपलब्ध असून, विशेष म्हणजे या स्मार्टफोनच्या खरेदीवर १० हजार २०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. म्हणजेच जुना फोन एक्सचेंज केल्यास केवळ ७९० रुपयांमध्ये हा स्मार्टफोन खरेदी करणे शक्य होणार आहे.

अॅमेझॉनच्या स्पेशल सेलमध्ये Oppo F17 हा स्मार्टफोन २० हजार ९९० रुपयांऐवजी १६ हजार ९९० रुपयांमध्ये ऑफर केला जात आहे. याशिवाय या स्मार्टफोनवर ४ हजार रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे.

Oppo F17 या स्मार्टफोनच्या खरेदीवर १२ हजार ४०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर आहे. ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज असलेला हा स्मार्टफोन जुना स्मार्टफोन देऊन एक्सचेंज केल्यास केवळ ४ हजार ५९० रुपयात खरेदी करू शकतो.

Read in English