WhatsApp वर एक छोटीशी चूक अन् लाखोंचा फटका; 'या' गोष्टी पडू शकतात महागात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 03:40 PM2020-05-10T15:40:31+5:302020-05-10T16:07:47+5:30

लॉकडाऊन दरम्यान अनेक बँकांनी आपल्या खाते धारकांना ओटीपी स्कॅमबाबत अलर्ट केलं आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर कोणत्या गोष्टी महागात पडू शकतात हे जाणून घेऊया.

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशभरात 17 मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. याच दरम्यान सोशल मीडियाचा वापर हा घरबसल्या मोठ्या प्रमाणात केला जात आहे.

एकमेकांशी कनेक्ट होण्यासाठी, व्हिडीओ पाहण्यासाठी, फोन करण्यासाठी मोठ्याप्रमाणात अनेक जण सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह झाले आहेत.

व्हॉट्सअ‍ॅपचा वापर ही लॉकडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात केला जात असून व्हॉट्सअ‍ॅप हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम आहे. मात्र WhatsApp वर एक छोटीशी चूक केल्यास लाखोंचा फटका बसू शकतो

लॉकडाऊन दरम्यान अनेक बँकांनी आपल्या खाते धारकांना ओटीपी स्कॅमबाबत अलर्ट केलं आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर कोणत्या गोष्टी महागात पडू शकतात हे जाणून घेऊया.

व्हॉट्सअ‍ॅपच्या मदतीने कधीच कोणालाही बँकिंग डिटेल्स पाठवू नका. तसेच अकाऊंट संबंधित माहिती, डेबिट अथवा क्रेडिट कार्डचा पिन नंबर किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणालाही सांगू नका.

अनेकदा बँकेकडून बोलतोय अस सांगून फेक कॉल केले जातात आणि ओटीपी विचारला जातो. ओटीपी कोणासोबतही शेअर करू नका.

एखाद्या अनोळखी क्रमांकावरून फाईल पाठवली असेल तर ती डाउनलोड करू नका. कदाचित ती मॅलिशस फाईल असू शकते.

काही वेळा फोन हरवतो तर कधी चोरीला देखील जातो. अशा वेळी फोनमधील व्हॉट्सअ‍ॅप लगेच डिअ‍ॅक्टिव्हेट करा.

फोन विकण्याआधी व्हॉट्सअ‍ॅप डेटा पुर्णतः क्लीअर करा. यासाठी सेटिंगमध्ये जाऊन रिस्टोर फॅक्टरी सेटिंगने डिव्हाईस डेटा वाईप करा.

ऑफर्स देऊन अनेक हॅकर युजर्सना आपल्या जाळ्यात ओढतात. त्यामुळे अशा मेसेजला रिप्लाय देऊ नका.

अनोळखी कॉन्टॅक्टने पाठवलेल्या मेसेजमध्ये अनेकदा फेक लिंक्स असतात. अशा लिंकवर क्लिक करू नका.

व्हॉट्सअ‍ॅप सेटिंगमध्ये जाऊन ऑटोडाऊन लोड डिसेबल करा. म्हणजे नको असलेल्या फाईल्स डाऊनलोड होणार नाहीत.

सार्वजनिक ओपन वाय फाय नेटवर्कवर व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करू नका. यामुळे हॅकिंगचा धोका हा वाढू शकतो.

सध्या लॉकडाऊनमध्ये खास करून नातेवाईक, मित्र-मैत्रिणी यांच्याशी संवाद साधण्यासाठी WhatsApp वर कॉन्फरन्स कॉल किंवा व्हिडीओ कॉलचा वापर केला जात आहे.

WhatsApp चॅटिंगची गंमत आता आणखी वाढणार आहे. युजर्सना 'लॉकडाऊन स्पेशल' स्टिकर्स पाठवता येणार असून यासाठी व्हॉट्सअ‍ॅपने खास स्टिकर पॅक आणला आहे.