Google Pay, Paytm सारख्या युपीआय अ‍ॅपमधून असे चोरले जातात पैसे; वाचा आणि सावध व्हा!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 01:19 PM2020-03-16T13:19:03+5:302020-03-16T13:29:19+5:30

आज पैसे बँकेत जरी ठेवले तरीही ते सुरक्षित नाहीत. बँका बुडण्याची भीती तर आहेच, पण ते दुसरीकडे कुठेतरी काढले किंवा वापरले जाण्याची मोठी शक्यता आहे. आज बँकिंग सेवा मोबाईलवर आली आहे. बऱ्याचशा कामांसाठी बँकेत जाण्याचीही गरज नाही. दुकानदाराला पैसे देण्यासाठी एटीएम कार्डाचीही गरज उरलेली नाही. एवढे हायटेक सारे झाले आहे ते भीम अॅप य़ा युपीआयमुळे.

आज डिजिटल ट्रान्झेक्शनद्वारे पैशांची देवाण-घेवाण मोठ्या प्रमाणावर केली जाते. सुट्टे पैसे देण्याऐवजी पेटीएम, फोन पे सारख्या अॅपवरून पैसे दिले जातात. हे सोईचे जरी असले तरीही तेवढेच धोक्याचेही बनले आहे. कारण ऑनलाईन बँकिंग फ्रॉडमध्येही मोठी वाढ झाली आहे.

आरबीआयने सुरु केलेले युपीआय जेवढे चांगले आहे तेवढेच ते फसवणूक करण्यासाठी सोपेही आहे. यामुळे अनेक ग्राहकांना त्यांच्या मेहनतीचे पैसे गमवावे लागले आहेत.

आज पैसे बँकेत जरी ठेवले तरीही ते सुरक्षित नाहीत. बँका बुडण्याची भीती तर आहेच, पण ते दुसरीकडे कुठेतरी काढले किंवा वापरले जाण्याची मोठी शक्यता आहे.

आज बँकिंग सेवा मोबाईलवर आली आहे. बऱ्याचशा कामांसाठी बँकेत जाण्याचीही गरज नाही. दुकानदाराला पैसे देण्यासाठी एटीएम कार्डाचीही गरज उरलेली नाही. एवढे हायटेक सारे झाले आहे ते भीम अॅप य़ा युपीआयमुळे.

युपीआय प्रणालीचा वापर करून गुगल पे, पेटीएम, फोन पे, अमेझॉन पे सारख्या शेकडो वॉलेटनी गुगल प्लेस्टोअर भरले आहे. मात्र, ही सर्व अॅप धोकादायक आहेत. या अॅपवर पैसे पाठविण्यासाठी रिक्वेस्ट करण्यात येते. हा फसवणुकीचा खूप सोपा मार्ग आहे.

युपीआय फ्रॉडसाठी युजरच्या मोबाईलचा रिमोट अॅक्सेस घेण्याचा प्रयत्न केला जातो. कारण ट्रान्झेक्शनही रिमोटली करता यावे. यासाठी गुगल प्ले स्टोअर किंवा अॅपल अॅप स्टोअरमधून AnyDesk किंवा TeamViewer डाऊनलोड करण्यास सांगितले जाते. या अॅपद्वारे या मोबईलचा ताबा हॅकरला मिळतो.

युजरने जर असे अॅप डाईनलोड केले तर त्या अॅपवर 9 अंकी कोड तयार होतो. यानंतर हॅकर युजरला हा कोड देण्यास सांगतो. 9 अंकी या नंबरद्वारे हॅकर त्या युजरचा फोन अलगद अॅक्सेस करू शकतो

जर युजरने हॅकरला परवानगी दिली तर मोबाईलची स्क्रीन ह्रॅकर वापरू शकतो. यामध्ये युजरची स्क्रीन दुसऱ्या मोबाईलवर उघडून कंट्रोल करता येते.

जर हॅकरकडे पासवर्ड नसेल तर तुम्ही जेव्हा ही अॅप वापरत असाल तेव्हा तो ते पाहून नंतर डल्ला मारू शकतो.

सावधगिरी बाळगण्यासाठी अशा कोमत्याही मेसेजवर क्लीक करून नये. तसेच मोबाईलवर येणारे प्रत्येक नोटिफिकेशन नेमके काय आहे हे वाचावे.

खात्री पटल्यानंतर क्लीक करावे. तसेच युपीआय अॅपवर आलेली रिक्वेस्टही तुम्ही पडताळूनच अॅक्सेप्ट किंवा रिजेक्ट करावी.

AnyDesk किंवा TeamViewer अज्ञात असलेली आणि कामाची नसलेली अॅप इन्स्टॉल करू नयेत.