आजपासून WhatsAppनं पाठवता येणार पैसे!; कंपनीनं सांगितलं - अशा पद्धतीनं करता येईल वापर

By श्रीकृष्ण अंकुश | Published: November 6, 2020 01:04 PM2020-11-06T13:04:37+5:302020-11-06T13:16:18+5:30

WhatsApp UPI Payment - आता देशातील WhatsApp यूझर्सना याच अ‍ॅपच्या माध्यमाने एकमेकांना पैसे ट्रांसफर करणे शक्य होणार आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) गुरूवारी WhatsAppला यासंदर्भात मंजुरी दिली.

WhatsAppला जवळपास 3 वर्षांपासून याची प्रतीक्षा होती. आता कंपनीने संपूर्ण भारतात ही सुविधा सुरू केली आहे. WhatsApp UPI बेस्ड पेमेंटची टेस्टिंग यापूर्वीच करण्यात आली आहे.

यासंदर्भात, फेसबुक इंडिया हेड अजीत मोहन यांनी सांगितले, ‘भारतात WhatsApp वर पेमेंट लाइव्ह झाले आहे आणि लोग WhatsAppच्या माध्यमाने पैसे पाठवू शकतात. कंपनी भारतात डिजिटल पेमेंट शिफ्टमध्ये योगदान देऊ शकेल, यामुळे आम्ही अत्यंत आनंदी आहोत.’

WhatsApp Payment भारतामध्ये दहा प्रादेशिक भाषांत उपलब्ध असेल. आपल्या व्हॉट्सअ‍ॅपमध्ये आधिपासूनच पेमेंटचे ऑप्शन असेल तर आपण हे वापरू शकता. अन्यथा व्हॉट्सअ‍ॅप अपडेट करून आपण पेमेंट ऑप्शन चेक करू शकता.

WhatsApp Payment वापरण्यासाठी कस्टमर्सजवळ डेबिट कार्ड असणे आवश्यक आहे. जे UPI सपोर्ट करते. व्हॉट्सअ‍ॅप Payment ऑप्शनमध्ये जाऊन, बँक सिलेक्ट करून आणि नंतर डीटेल्स टाकून आपण हे अ‍ॅक्टिवेट करू शकता.

WhatsAppने अपल्या स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे, ‘आजपासून देशभरातील WhatsApp यूझर्स या अ‍ॅपच्या माध्यमाने पेमेंट करू शकतील. WhatsApp सिक्यूर पेमेंट एक्सपेरिअस मेसेज पाठविण्याएवढेच पैसे पाठवणेही सोपे बनवेल’

WhatsAppने नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या साथीने यूनिफाईड पेमेंट सिस्टीम अर्थात UPI बेस्ड पेमेंट इंटरफेस तयार केले आहे. तसेच यात डेटा लोकलायझेशनवरही लक्ष देण्यात आले आहे.

WhatsAppने पेमेंट सर्व्हिससाठी पाच मोठ्या बँकांशी करार केला आहे. यात ICICI Bank, HDFC Bank, Axis Bank, SBI आणि JIo Payments Bank यांचा समावेश आहे.

WhatsApp ने केवळ WhatsApp वरच नाही, तर कोणत्याही UPI सपोर्टेड अ‍ॅपवर पैसे पाठवता येऊ शकतात. अर्थात समोरील व्यक्ती व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट वापरत नसेल तरीही आपण WhatsAppने पेमेंट करू शकतात.

WhatsAppने दिलेल्या माहितीनुसार, येथे पेमेंट करणे सुरक्षित असेल आणि प्रत्येक ट्रांझॅक्शनसाठी UPI पिनची आवश्यकता असेल.

स्टेटमेंटमध्ये कंपनीने म्हटले आहे, WhatsApp payments अँड्रॉईड आणि आयओएस या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असेल. यासाठी युझर्स अ‍ॅप अपडेटही करू शकतात.