Koo अ‍ॅपवरून युजर्सचा पर्सनल डेटा होतोय लीक, चीनचं कनेक्शन असल्याचंही समोर!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 01:23 PM2021-02-11T13:23:07+5:302021-02-11T13:40:21+5:30

koo app : एका फ्रेंच सिक्योरिटी रिसर्चरच्या म्हणण्यानुसार, कू अ‍ॅप सुरक्षित नाही आणि युजर्सचा वैयक्तिक डेटा त्यातून लीक होत असल्याची मिळाली आहे.

नवी दिल्ली : स्वदेशी ट्विटर म्हणून ओळखले जाणारे कू (koo) अ‍ॅप सध्या चर्चेत आहे. केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांनी कू अॅपवर आपले अकाउंट तयार केले आहे.

यातच, एका फ्रेंच सिक्योरिटी रिसर्चरच्या म्हणण्यानुसार, कू अ‍ॅप सुरक्षित नाही आणि युजर्सचा वैयक्तिक डेटा त्यातून लीक होत असल्याची मिळाली आहे. यामध्ये ईमेल आयडी, फोन नंबर आणि जन्मतारीख यांचा समावेश आहे.

फ्रेंच सायबर सिक्युरिटी संशोधक Robert Baptiste यांना त्यांच्या ट्विटर अकाउंटमुळे Elliott Anderson या नावानेही ओळखले जाते. कू बद्दल काही रिसर्च केले आणि ते सुरक्षित नसल्याचे दिसून आले, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, याआधी आधार स्टिस्टममध्येही त्रुटींचा उल्लेख केल्याप्रकरणी Robert Baptiste चर्चेत आले होते.

काल रात्री Robert Baptiste यांनी ट्विटमध्ये लिहिले की, 'मी तुमच्या सांगण्यावरून नवीन कू अ‍ॅपवर 30 मिनिटे घालवली आहेत. हे अॅप युजर्सचा वैयक्तिक डेटा लीक करत आहे. यात ईमेल, जन्मतारीख, नाव, वैवाहिक स्थिती आणि लिंग यांचा समावेश आहे.'

सिक्योरिटी रिसर्चरने याबद्दल स्क्रीनशॉट देखील शेअर केले आहेत. स्क्रीनशॉटवरून हे स्पष्ट झाले आहे की, अ‍ॅप बराच वैयक्तिक डेटा लीक करत आहे. आतापर्यंत अॅपच्या कोट्यवधी युजर्सचा डेटा लीक झाल्याची शक्यता आहे.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की, भारत सरकारचे काही विभाग आणि मंत्रीही या प्लॅटफॉर्मशी जोडले गेले आहे. अशा परिस्थितीत त्यांचे नावही या लिस्टमध्ये सामील होऊ शकते.

Robert Baptiste यांनी डोमेन Kooapp.com चा Whois रेकॉर्ड देखील शेअर केला आहे. जो चिनी कनेक्शन दिसून येत आहे. जे पूर्णपणे योग्य नाही. ज्या डोमेन डिटेल्सला रिसर्चरने शेअर केले आहे, ते डोमेनच्या हिस्टोरिकल ओनरशिपचा भाग आहे. रेकॉर्डमुळे असे समजते की, हे जवळपास चार वर्षांपूर्वी तयार केले गेले होते. तेव्हापासून यामध्ये बरेच बदल झाले आहेत. कू अॅपची लेटेस्ट मालकी Bombinate Technologies प्रायव्हेट लिमिटेडकडे आहे.

विशेष म्हणजे, डोमेन अॅड्रेसच्या मॅनेजमेंटमध्ये बदल करणे काही आश्चर्यकारक नाही आहे. कारण, हे सुद्धा शक्य आहे की, ज्या डोमेनला सध्या जर एखादी एनजीओद्वारे चालविले जात आहे. तर असेही होऊ शकते की, ती आधी एखादी बेकायदेशीर व्यवसाय करणारी कंपनी चालवत असेल.

मात्र, अ‍ॅपसोबत एक चिनी कनेक्शन आहे. म्हणजेच, कंपनीमध्ये Shunwei ची काही गुंतवणूक आहे. Xiaomiशी संबंधित Shunwei एक व्हेंचर कॅपिटल फंड आहे, जी स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करते. मात्र, कंपनी स्वतःला पूर्णपणे आत्मनिर्भर अॅप म्हणत आहे आणि कंपनीचे म्हणणे आहे की, Shunwei लवकरच आपला हिस्सा विकणार आहे.

भारत सरकार आणि ट्विटर यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. शेतकरी आंदोलन आणि खालिस्तान समर्थकांशी संबंधित काही अकाउंटवर बंदी घालण्यासाठी सरकारने ट्विटरला पत्र लिहिले होते. ट्विटरने यातील काहींवर कारवाई करण्यास नकार दिला होता.

यादरम्यान, स्वदेशी ट्विटर म्हणून ओळखल्या जाणार्‍या कू अ‍ॅपला चालना मिळाली आहे. आता इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (MeiTY) आणि इतर अनेक सरकारी विभागांनी आपले अकाउंट कू अ‍ॅपवर तयार केली आहेत. तर यामध्ये अनेक नेत्यांचीही अकाउंट आहेत.

याचबरोबर, अॅपच्या रिअल ट्विटर अकाइउंटवरूनही गोंधळ आहे. आतापर्यंत लोकांना असे वाटले होते की @kooappofficioal हे अ‍ॅपचे ऑफिशियल हँडल आहे. मात्र, ट्विटरवरील कूअ‍ॅपचे ऑफिशियल अकाउंट @kooindia असल्याचे सह-संस्थापक अप्रमेय राधाकृष्ण यांनी ट्विट करुन सांगितले आहे.