तुमच्या नावाचं Sim Card भलतच कोणीतरी वापरतंय का? 'अशी' करून घ्या खात्री

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2021 05:31 PM2021-04-24T17:31:16+5:302021-04-24T17:35:42+5:30

sim cards: तुमच्या नावावर कोणी मोबाइल नंबर वापरत असेल, याची माहिती आता उपलब्ध होऊ शकणार आहे. तुमच्या नावावर किती सीमकार्ड आहेत, ती कशी deactivate करावीत? पाहा, डिटेल्स...

भारतात कोट्यवधी नागरिक मोबाइल वापरतात. अनेक जण व्यवसाय, नोकरी, उद्योग, वैयक्तिक कारणे किंवा इतरांचे पाहून एकापेक्षा दोन मोबाइल क्रमांक वापरतात. ड्युअर सीमकार्डची (SIM CARD) सोय असणाऱ्या मोबाइलची संख्याही वाढताना दिसतेय.

मात्र, फेक आयडीचा वापर करून मोबाइल क्रमांक घेत गुन्हे घडल्याच्याही अनेक घटना आपण पाहतो. त्यासाठी काही गोष्टी बंधनकारक केल्या असल्या, तरीही असे गुन्हे आताच्या घडीलाही घडताना पाहायला मिळतात.

तुमच्या नावावर कोणी मोबाइल नंबर वापरत असेल, याची माहिती सर्वसामान्यपणे युझर्सला मिळत नाही. मात्र, आता ही माहिती सुद्धा समजू शकणार आहे. तसेच तुमच्या नावावर किती सीमकार्ड सुरू आहेत, याची माहिती आता उपलब्ध होऊ शकणार आहे.

यासाठी दूरसंचार विभाग (DoT) ने एक पोर्टल tafcop.dgtelecom.gov.in असे संकेतस्थळ लाँच केले आहे. याच्या मदतीने तुम्ही सहज जाणून घेऊ शकाल की, तुमच्या नावावर सध्या किती मोबाइल नंबर वापरले जात आहे.

दुसऱ्या व्यक्तीच्या डिटेल्सचा वापर करून मोबाइल सीमकार्ड घेणे हे बेकायदेशीर आहे. परंतु, अशा घटना वारंवार समोर येत आहेत. त्यामुळे डिपार्टमेंटने या टूलला लाँच केले आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

या ऑनलाइन टूलच्या मदतीने जो नंबर तुम्ही वापरत नसाल अशा नंबर्सपासून तुम्ही सुटका मिळवू शकता. या वेबसाइटद्वारे युझर्सना माहिती मिळू शकेल की, त्यांच्या नावावर कोण-कोण सीमकार्ड वापरत आहेत. किती मोबाइल नंबर्स सुरू आहेत.

तसेच तुमच्या नावावर कोणी सीमकार्ड वापरत असल्याचे आढळून आल्यास युझर्स या नंबर्सला ब्लॉक करण्याची रिक्वेस्ट टाकू शकतात, अशी माहिती दूरसंचार विभागाचे उप संचालक जनरल ए रॉबर्ट रवी यांनी दिली आहे.

एका व्यक्तीला जास्तीत जास्त ९ मोबाइल कनेक्शन दिले जाऊ शकते. अनेक युजर्संच्या नावावर ९ हून जास्त मोबाइल कनेक्शन सुरू आहेत. हे पोर्टल आंध्र प्रदेश आणि तेलंगानाच्या लायसन्स असलेल्या सेवा क्षेत्रात आहे.

याशिवाय, या सर्विसला अन्य फेज मध्ये लागू केले जाणार आहे. युजर्स या पोर्टलद्वारे सहज आपल्या नावावर सुरू असलेले कनेक्शनसंबंधी माहिती करू शकतात.

यासाठी त्यांना आपला सुरू असलेला नंबर टाकावा लागेल. त्यानंतर एक ओटीपी मिळेल. याच्या मदतीने ते सर्व अॅक्टिव्ह नंबर्सच्या संबंधी माहिती मिळवू शकतात.

डिपार्टमेंटच्या सर्व कंज्यूमर्सला एसएमएस द्वारे याची माहिती देण्यात येते की, त्यांच्या नावावर किती नंबर्स अॅक्टिव आहेत. त्यानंतर कंज्युमर्स पोर्टलवर जाऊन त्या नंबर्स संबंधी रिपोर्ट करू शकतात.