तुम्हाला माहीत आहेत का आयफोनचे 'हे' सीक्रेट फीचर?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2019 04:28 PM2019-05-03T16:28:32+5:302019-05-03T16:37:44+5:30

आयफोनची लोकप्रियता ही सर्वात जास्त आहे. आयफोनमध्ये असलेल्या काही फीचरमुळे आपली अनेक काम सोपी होतात. मात्र आयफोनमध्ये असे काही फीचर्स आहेत ज्याची माहिती फार कमी युजर्सना असते. अशाच फीचर्सबाबत जाणून घेऊया.

फोन डिस्प्लेच्या मधोमध खालच्या दिशेने स्वाईप केल्यास स्पॉटलाइट सर्चचा एक पर्याय मिळेल. याच्या मदतीने तुम्ही कोणतीही फाइल फोनमध्ये शोधू शकता. याच पद्धतीने सेटींग अ‍ॅपच्या वरून खालच्या दिशेने स्वाईप केल्यास एक सर्च बार ओपन होईल. यामध्ये फोनची कोणतीही सेटींग टाईप करून ती शोधता येते.

फोनच्या कॉन्टॅक्ट अ‍ॅपमध्ये जाऊन कोणत्याही खास व्यक्तीसाठी कस्टम अलर्ट लावता येऊ शकतो. यासाठी कॉन्टॅक्ट अ‍ॅपमध्ये त्या व्यक्तीचा कॉन्टॅक्ट टॅप करून ओपन करा. एडिटवर जा आणि रिंग टोन आआणि टेक्स्ट टोनवर क्लिक करा. त्यानंतर अ‍ॅपलच्या रिंगटोन्स आणि टेक्स्ट टोन्सटी एक लिस्ट ओपन होईल. त्यामधील एक पर्याय तुम्ही निवडू शकता. यामुळे त्या खास व्यक्तीचा कॉल अथवा टेक्स्ट आल्यास लगेच समजेल.

फोनच्या सेटींगमध्ये जाऊन जनरल आणि अ‍ॅक्सेसिबिलिटीमध्ये जाऊन मॅग्निफायरवर टॅप करा. यामुळे तुम्ही तुमच्या फोनचे होम बटण दाबून कॅमेरा एका मॅग्निफाईंग ग्लासमध्ये तर स्क्रीन एका व्यू फाइंडरमध्ये बदलू शकता.

जेव्हा एखादं नोटिफिकेशन येतं तेव्हा फोनच्या लॉक स्क्रीनवर उजव्या बाजूने स्वाइप करा आणि त्यानंतर मॅनेजवर टॅप करा. तसेच तुम्ही नोटिफिकेशन्स पूर्णत: बंद करू शकता.

फोनच्या कंट्रोल सेंटरमध्ये 'डू नॉट डिस्टर्ब वाइल ड्रायविंग' फीचर अ‍ॅक्टिवेट करा. त्यानंतर जेव्हा तुम्ही वाहनामध्ये असाल तेव्हा आपोआपचं डू नॉट डिस्टर्ब मोड अ‍ॅक्टिव्ह होणार आहे. तसेच सर्व नोटिफिकेशन, टेक्स्ट आणि फोन कॉल म्यूट होणार.

फोनमध्ये तुम्ही ट्रॅडिशनल कीबोर्ड ऐवजी वन हँडेड कीबोर्डचा वापर करू शकता. जर तुमचा एक हात व्यस्त असेल तर या फीचरचा फायदा होणार आहे. यासाठी कीबोर्डचा वापर करा असा कोणताही एक अ‍ॅप ओपन करा. कीबोर्डमध्ये इमोजी किंवा ग्लोब या आयकॉनवर टॅप करा. त्यानंतर कोपऱ्यामध्ये वन हँडेड कीबोर्ड दिसेल.

बॅटरी लवकर संपेल अशी चिंता वाटत असेल तर कंट्रोल सेंटरमध्ये जा आणि बॅटरी आयकॉनवर क्लिक करून लो पॉवर मोड चालू करा. लो पॉवर मोड अ‍ॅप्सचं बॅकग्राऊंड रिफ्रेश होण्यापासून रोखतं. तसेच ऑटोमॅटीक डाऊनलोड आणि इतर काही फीचर बंद करतात.