खुशखबर! iPhone स्वस्तात विकत घेण्याची सुवर्णसंधी; Apple प्रोडक्ट्सवर जबरदस्त डिस्काउंट

By सिद्धेश जाधव | Published: December 27, 2021 03:28 PM2021-12-27T15:28:16+5:302021-12-27T15:41:47+5:30

जर तुम्ही लेटेस्ट Apple प्रोडक्ट्स विकत घेण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी ठरू शकते. Vijay Sales आणि imagine store सध्या iPhone 13, iPhone 12, iPhone 11, MacBook Air, Apple Watch Series 7, AirPods आणि इतर अनेक अ‍ॅप्पल प्रोडक्ट्सवर भरघोस डिस्काउंट देत आहेत.

विजय सेल्सनं Apple Days sale चं आयोजन केलं आहे आणि यात अनेक ऍप्पल प्रोडक्ट्सवर डिस्काउंट दिला जात आहे. हा सेल 31 डिसेंबरपर्यंत कंपनीच्या वेबसाईट आणि ऑफलाईन स्टोर्सवर सुरु राहील.

इमॅजिन स्टोर्स देखील मोठ्या शहरांमध्ये उपलब्ध आहेत. त्यांच्या देखील स्टोर्स आणि वेबसाईटवर 31 डिसेंबरपर्यंत अ‍ॅप्पल प्रोडक्ट्स स्वस्तात विकत घेता येतील.

iPhone 13 Pro Max डिस्काउंटनंतर विजय सेल्समधून 1,24,400 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच HDFC बँकेच्या कार्ड धारकांना 6,000 रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट देखील मिळेल.

विजय सेल्स 79,900 रुपयांचा iPhone 13 या सेलमध्ये 75,900 रुपयांना विकत आहे. HDFC कार्ड धारकांना यावर 6,000 रुपयांचा इन्स्टंट कॅशबॅक मिळेल.

HDFC बँकेच्या ऑफर नंतर iPhone 13 Mini विजय सेल्समधून 60,400 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

HDFC बँकेची ऑफर आणि एक्सचेंज बेनिफिट्सचा वापर करून iPhone 12 स्मार्टफोन 41,900 रुपयांमध्ये Imagine stores वरून विकत घेता येईल. या फोनची मूळ किंमत 65,900 रुपये आहे.

iPhone 11 फक्त 28,500 रुपयांमध्ये विकत घेता येईल. यासाठी HDFC बँकेच्या ग्राहकांना मिळणारा 4,000 रुपयांचा कॅशबॅक आणि जुना फोन देऊन 11,000 रुपयांपर्यंत मिळणारा डिस्काउंट या ऑफर्स वापराव्या लागतील.

31 डिसेंबरपर्यंत MacBook Air, MacBook Pro, AirPods, Apple Watch, iPad आणि HomePod mini देखील डिस्काउंटसह विजय सेल्समधून विकत घेता येतील.