Gmail वर असा करा ई-मेल शेड्यूल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 02:06 PM2019-04-29T14:06:15+5:302019-04-29T14:19:18+5:30

गुगल नेहमीच आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर आणत असतं. ई-मेल सर्व्हिस म्हणजेच Gmail मध्ये मेल शेड्यूल करता येतात. गेल्या वर्षी गुगलने हे फीचर आणले होते.

Gmail च्या या फीचरच्या मदतीने मेल फेसबुक पोस्ट प्रमाणे शेड्यूल करता येतात. याचा फायदा हा सर्वांनाच होत आहे. मेल शेड्यूल कसा करायचा हे जाणून घेऊया.

सर्वप्रथम ब्राऊजर ओपन करून त्यामध्ये Gmail ओपन करा. त्यानंतर आपला ई-मेल आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा.

Gmail अकाऊंट ओपन केल्यानंतर 'Compose' वर क्लिक करा. त्यानंतर New Message विंडो ओपन झाल्यावर तुम्हाला हवा असलेला मेल लिहून ज्यांना तो मेल पाठवायचा आहे त्यांचा मेल आयडी टाका.

मेल आणि मेल आयडी टाईप केल्यानंतर खाली Send हा पर्याय दिसेल. त्यावेळी Send वर क्लिक करण्याऐवजी त्याच्या बाजूला असलेल्या एका आयकॉन वर क्लिक करा. त्यानंतर Schedule Send वर क्लिक करा.

Schedule Send वर क्लिक केल्यानंतर एक छोटी विंडो ओपन होईल. त्यामध्ये पॉसिबल टाईम ऑप्शन्स देण्यात येतील.

पॉसिबल टाईम ऑप्शन्समध्ये तुम्हाला हवी असलेली वेळ देण्यात आली नसेल तर 'Pick Date and Time' वर क्लिक करा.

क्लिक केल्यानंतर एक कॅलेंडर ओपन होईल. जिथे डेट आणि टाईम निवडण्याचा पर्याय देण्यात आलेला आहे. त्यानंतर वेळ निवडून आपण मेल शेड्यूल करू शकतो.