शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

अरे व्वा! WhatsApp Call रेकॉर्डिंगसाठी थर्ड-पार्टी Appची गरज नाही! फक्त एक सेटिंग बदला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 13:26 IST

1 / 8
WhatsApp हा जगभरातील एक लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. यावर अनेक भन्नाट फीचर्स असतात. सुरुवातीला ते मेसेजिंग प्लॅटफॉर्म म्हणून सुरू झालं होतं, परंतु आता व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचरही मिळतं.
2 / 8
बरेच लोक आता त्यांच्या दैनंदिन जीवनात WhatsApp कॉल वापरत आहेत. मात्र याचदरम्यान एखाद्याचे कॉल रेकॉर्ड करायचे असल्यास काय करावं असा प्रश्न त्यांना पडतो.
3 / 8
WhatsApp मध्ये इन बिल्ट कॉल रेकॉर्डिंग फीचर नसल्याने, बरेच लोक थर्ड-पार्टी एप्स वापरतात. थर्ड-पार्टी एप्स वापरणं हे धोकादायक असू शकतं.
4 / 8
कोणताही WhatsApp कॉल रेकॉर्ड करण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे स्क्रीन रेकॉर्डिंग. तुम्हाला फक्त तुमच्या फोनवर स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन करावं लागेल. असं केल्याने तुमच्या फोनची स्क्रीन तसेच तुमचा WhatsApp कॉल रेकॉर्ड होईल.
5 / 8
स्क्रीन रेकॉर्डिंग चालू करण्यासाठी, तुम्हाला काही स्टेप फॉलो कराव्या लागतील. अँड्रॉइड युजर्स क्विक सेटिंग्जमधून हे करू शकतात. त्यांना क्विक सेटिंग्ज पॅनल ओपन करावं लागेल.
6 / 8
स्क्रीन रेकॉर्डिंग ऑप्शन त्यानंतर ऑन करावा लागेल. वेगवेगळ्या फोनवर या फीचरची वेगवेगळी नावं असू शकतात.
7 / 8
कॉल रेकॉर्डिंगसाठी हे फीचर वापरताना, कॉल स्पीकरवर ठेवल्यास तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतील. लक्षात ठेवा की ही ट्रिक फक्त अँड्रॉइड फोनवरच काम करते.
8 / 8
जर तुम्ही एपल युजर्स असाल, तर ही ट्रिक काम करणार नाही. WhatsApp कॉलवर स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन असेल, परंतु ऑडिओ रेकॉर्ड केला जाणार नाही.
टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान