Googleने 22 धोकादायक अॅप्स केली डिलिट, तुम्ही फोन चेक केला का?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 03:58 PM2018-12-12T15:58:10+5:302018-12-12T16:23:23+5:30

गुगलनं आपल्या प्ले स्टोरमधून तब्बल 22 अॅप्स डिलिट केले आहेत. डिलिट करण्यात आलेले अॅप्स हे कोणत्याही कम्प्युटर किंवा मोबाइल व्हायरसप्रमाणेच धोकादायक होते. या अॅपद्वारे जाहिरातींच्या माध्यमातून फसवणूक होत असल्याची माहिती समोर आली आहे. सिक्योरिटी अॅप्स बनवणारी सायबर सिक्योरिटी कंपनी Sophos द्वारा प्रसिद्ध करण्यात आलेलेल्या ब्लॉग पोस्टनंतर गुगलकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. ही अॅप्स डिलिट होण्यापूर्वी एकूण 20 लाख जणांनी ते डाऊन केले होते. Sophos ने केलेल्या तपासात हे सर्व अॅप Andr आणि Clickr-ad नेटवर्कसोबत जोडले गेलेले होते. हे एक सिस्टेमॅटिक मालवेअर असून यामुळे युजर्स आणि अँड्रॉईड इकोसिस्टमचे प्रचंड नुकसान होऊ शकते. कारण ही अॅप्स फेक क्लिकद्वारे जाहिरात नेटवर्कला चांगला महसूल मिळवून देतात. दरम्यान, ही अॅप्स लोकांच्या स्मार्टफोन्समधून हटवण्यात आली आहेत की नाहीत, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

1.स्पार्कल फ्लॅशलाइट (Sparkle FlashLight)

2.स्नॅक अटॅक (Snake Attack)

3. मॅथ्स सॉल्व्हर (Math Solver)

4. शेपसॉर्टर (ShapeSorter)

5. टेक अ ट्रिप (Tak A Trip)

6. मॅग्निफाय (Magnifeye)

7. Join Up (जॉइन अप)

8. झोम्बी किलर (Zombie Killer)

9. स्पेस रॉकेट (Space Rocket)

10. निऑन पॉन्ग (Neon Pong)

11. जस्ट फ्लॅशलाइट ( Just Flashlight)

12. टेबर सॉकर (Table Soccer)

13. क्लिप डायव्हर (Cliff Diver)

14. बॉक्स स्टॅक (Box Stack)

15. जेली स्लाइस (Jelly Slice)

16. ए.के.ब्लॅकजॅक (AK Blackjack)

17. कलर टाइल्स (Color Tiles)

18. अॅनिमल मॅच (Animal Match)

19. रुलेट मेनिया (Roulette Mania)

20. हेक्साफॉल

21. हेक्साब्लॉक्स (HexaBlocks)

22. पेअरझॅप (PairZap)