भारीच! WhatsApp ला टक्कर देणारं Gmail चं नवीन भन्नाट फीचर? युजर्सला मिळणार 'ही' खास सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2021 03:47 PM2021-12-09T15:47:37+5:302021-12-09T15:55:06+5:30

Gmail Feature : Gmail आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असतं. जीमेलमध्ये असलेल्या फीचरमुळे अनेक कामं सोपी होतात.

Gmail आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असतं. जीमेलमध्ये असलेल्या फीचरमुळे अनेक कामं सोपी होतात. जीमेलच्या अनेक फीचरची सर्वसामान्यांना माहिती नाही. अनेकजण केवळे ईमेल, अटॅचमेंट पाठवण्यासाठी आणि रिसीव्ह करण्यासाठी फक्त जीमेलचा वापर करतात.

Gmail द्वारे आता कॉलदेखील करता येणार आहे. Google ने ही सुविधा सुरू केली आहे. Google च्या या फीचरचा वापर करण्यासाठी युजरकडे Gmail चं लेटेस्ट व्हर्जन अपडेट असणं गरजेचं आहे. हे फीचर केवळ Gmail App युजर्ससाठीच दिलं जात आहे.

Gmail चं हे फीचर इतर इन्स्टंट मेसेजिंग सारखंच आहे. युजर्स Updated App द्वारे व्हिडीओ आणि ऑडिओ कॉल करू शकतात. Gmail मध्ये युजर्सला ऑडिओ आणि व्हिडीओ कॉलसाठी चॅट टॅब मिळणार आहे.

युजरने या टॅबवर क्लिक केल्यानंतर संबंधित व्यक्तीशी वन-ऑन-वन कॉल करता येईल. Google ने आपल्या प्लॅटफॉर्मवर ग्रुप कॉलची सुविधा दिलेली नाही. Gmail ओपन करुन Chats टॅबवर क्लिक करावं लागेल.

Google Workspace युजर्ससाठी हा ऑप्शन डिफॉल्ट एनेबल असतो. रेग्युलर युजर्सला Chats ऑप्शन सेटिंगमध्ये एनेबल करावा लागेल. चॅट सेक्शनचे सर्व Conversations लिस्टमध्ये मिळतील. यापैकी एकावर टॅप करा.

वरच्या बाजूला फोटो किंवा व्हिडीओ आयकॉनवर टॅप करुन ऑडिओ किंवा व्हिडीओ कॉल करता येईल. Gmail वर जर कॉल आला तर, रेग्युलर फोन कॉलप्रमाणे फ्लोटिंग कॉल नोटिफिकेशन मिळेल. Gmail युजर्सला मिसकॉल अलर्टचंही नोटिफिकेशन मिळेल.

हे फीचर सध्या मोबाईल डिव्हाइससाठी आहे. वेबसाठी हे फीचर सध्या उपलब्ध करण्यात आलेलं नाही. WhatsApp प्रमाणे Gmail Calls देखील इंटरनेट बेस्ड असून यासाठी इंटरनेट कनेक्टिविटी असणं गरजेचं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.