Flipkart मोबाइल बोनांझा सेल; iPhone 11, Moto G 5G, Realme 6 यासारख्या फोनवर मिळतोय डिस्काउंट!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2021 10:23 PM2021-01-28T22:23:47+5:302021-01-28T22:49:44+5:30

Flipkart ने आपल्या प्लॅटफॉर्मवर Mobile Bonanza सेलचे आयोजन केले आहे. या सेलमध्ये Samsung, Xiaomi, Realme आणि POCO सारख्या अनेक लोकप्रिय कंपन्यांच्या स्मार्टफोनवर डिल्स देण्यात येत आहेत.

याचबरोबर, कंपनी आयसीआयसीआय क्रेडिट आणि डेबिट कार्डवर देखील विशेष सवलत देत आहे. तसेच, एक्सचेंज ऑफरचा लाभ ग्राहक घेऊ शकतात. चला तर मग, काही स्मार्टफोन डिल्स जाणून घेऊया....

Flipkart Mobile Bonanza सेल पेजनुसार, iPhone SE आयसीआयआयसी बँकेच्या ऑफरसोबत 27,999 रुपयांच्या प्रभावी किंमतीत खरेदी करता येईल. तसेच, सेलमध्ये 30,000 रुपयांच्या आत बरेच अँड्रॉईड फोन्स उपलब्ध आहेत.

यामध्ये OnePlus Nord, Xiaomi Mi 10i आणि Samsung Galaxy M51 सारख्या फोनचा समावेश आहे. साइटवर Poco M2 Pro ला 11,999 रुपयांमध्ये लिस्ट केले आहे. मात्र, आयसीआयसीआय बँक कार्ड धारक हा 10,999 रुपयांना खरेदी करू शकतात. हा फोन 720G प्रोसेसर, 5,000mAh आणि 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येत आहे.

Apple iPhone 11 फ्लिपकार्ट Mobile Bonanza सेलमध्ये 49,999 रुपयांमध्ये लिस्टेड आहे. हा आयसीआयसीआय बँकेच्या ऑफरसह 48,999 रुपयांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. तसेच, जुन्या फोन एक्सचेंजद्वारे 16,500 रुपयांपर्यंतची सूट देखील मिळू शकते.

फ्लिपकार्टच्या सध्याच्या सेलमध्ये आयसीआयसीआय बँकेच्या ऑफरसोबत Samsung Galaxy S20+ हा मोबाईल 43,999 रुपयांना आहे, तर iPhone XR 39,999 रुपयांना आणि Realme C15 हा 8,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

याचप्रमाणे फ्लिपकार्टवर आयसीआयसीआय बँकेच्या ऑफरसह Realme Narzo 20 Pro आणि Realme 6 हे फोन 12,999 रुपयांमध्ये खरेदी करता येतील.

ग्राहक Moto G 5G हा फोन आयसीआयसीआय बँक ऑफरच्या 1,000 रुपयांच्या डिस्काऊंटसोबत 18,999 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो.

लॉन्चिंगवेळी Moto G 5G या फोनची किंमत 20,999 रुपये होती. फ्लिपकार्टचा हा मोबाईल बोनांझा सेल फक्त 29 जानेवारीपर्यंत चालणार आहे.