दर तासाला कमवा हजारो रुपये! हवा फक्त एक स्मार्टफोन आणि इंटरनेट कनेक्शन; जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2021 03:13 PM2021-11-18T15:13:41+5:302021-11-18T15:29:13+5:30

Earn Money Online by Smartphone : तुम्ही जर महाविद्यालयीन विद्यार्थी आहात आणि तुम्हाला शिक्षण घेता घेता एक कमाईचं साधनही हवं असेल तर एक चांगली संधी आहे. ऑनलाइन विश्वात पार्ट टाइम जॉब्सची सोपे पर्याय उपलब्ध आहेत. याच पर्यायांबाबत जाणून घेऊयात...

तुमचा दैनंदिन खर्च दिवसेंदिवस वाढत असेल आणि त्यासाठी तुम्ही खूप चिंतेत असाल तर तुमच्या मिळकतीला हातभार लावण्यासाठी काही सोपे पर्याय उपलब्ध आहेत. घरबसल्या नेमकं कसं कमवायचं याची माहिती नसते. तसंच यात धोका असल्याची धारणा झाल्यानं कोण याकडे गांभीर्यानं पाहात नाही. पण ऑनलाइन कमाईची साधी आणि सोपी साधनं उपलब्ध आहेत. याच बाबत आपण जाणून घेणार आहोत.

गुगल प्ले स्टोअरवर असे अनेक अॅप्स आहेत की ज्यांच्या माध्यमातून तुम्ही हजारो रुपयांची कमाई करु शकता. तेही दर तासाला कमाई करू शकता. अर्थात यासाठी तुम्हाला थोडा रिसर्च करावा लागेल. कारण गुगल प्ले-स्टोअरवर अनेक फेक अॅप्स देखील असतात. ते जाणून घेऊन आणि संपूर्ण माहिती घेऊनच पुढचं पाऊल टाकता येईल. अनेक अॅप्स कमाईसाठी नव्हे, तर केवळ कंपनीच्या प्रमोशनसाठी तयार केलेले असतात. अशा अॅप्सचा आपल्याला काहीच फायदा नाही.

आज आपण असे काही अॅप्स आणि पर्याय पाहणार आहोत की ज्यातून नक्कीच तुम्हाला कमाई करता येईल. तसंच यातून तुमच्यी सवडीनुसार काम करुन कमाई करता येणाऱ्या पर्यायांबाबत आपण जाणून घेणार आहोत. या अॅप्समध्ये कोणत्याही प्रकारचं वेळेचं बंधन म्हणजे कामाच्या तासांचं आणि शिफ्टचं बंधन नसतं.

मोबाइल गेमिंगचं मार्केट आता अवाढव्य पातळीवर वाढलं आहे. तुम्हाला गेमिंगमध्ये आवड असेल तर गेम टेस्टर म्हणून तुम्ही एखाद्या ऑनलाइन गेमिंग अॅप्ससाठी काम मिळवू शकता. फक्त गेमिंगमध्ये तुमची आवड असायला हवी आणि तुम्ही गेममधील त्रृटी दाखवून देण्यासाठी सक्षम असणं गरजेचं आहे.

तुम्हाला फक्त कंपनी सांगेल ते गेमिंग अॅप तुमच्या स्मार्टफोनमध्ये डाऊनलोड करावं लागतं. त्यानंतर संबंधित गेम तुम्ही खेळून त्याबाबतचा अनुभव कंपनीला द्यायचा असतो. यात तुम्हाला संबंधित गेममधील चांगल्या आणि वाईट गोष्टींची माहिती कंपनीला द्यावी लागते. जेणेकरुन कंपनीला त्यावर काम करता येईल. असं करण्यासाठी कंपनी गेम टेस्टरला पैसे देतं.

गेम टेस्टिंगसाठी कंपनी दरतासाचे ५० ते १५० रुपयांपर्यंतचं मानधन देते. जर तुम्ही खूप चांगले टेस्टर असाल तर एका तासात तुम्ही पाच ते सहा गेम्सचं टेस्टिंग करु शकता. या हिशोबानुसार तुमची सहज १ ते दीड हजार रुपयांची कमाई होऊन जाते.

सध्या अनेक कंपन्या आपल्या वस्तूंचा अभिप्राय जाणून घेण्यासाठी किंवा ग्राहकांची आवड निवड जाणून घेण्यासाठी सर्वेक्षणाचा मार्ग निवडतात. यातही आता ऑनलाइन सर्व्हेचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या मोबाइलमध्ये ऑनलाइन सर्व्हेसाठी तयार केलेलं खास अॅप डाऊनलोड करावं लागतं. ज्यात तुम्ही केलेल्या सर्व्हेसाठी कंपनी तुम्हाला मानधन देते.

कंपनीकडून मागितले जाणारे सर्व्हे तुम्हाला ठराविक वेळेत पूर्ण करुन द्यायचे असतात. यात एका सर्व्हेसाठी जवळपास १०० रुपये कंपन्या देत असतात. अशा पद्धतीनं तुम्ही १० सर्व्हे केले तर काही तासांमध्ये किंवा एका दिवसात १ हजार रुपयांची कमाई करू शकता.

गुगल प्ले-स्टोअरवर असे अनेक अॅप्स आहेत की ज्यात अनेक प्रोडक्ट दिले जातात. तुम्हाला संबंधित प्रोडक्टचा रिव्ह्यू कंपनीला द्यायचा असतो. ज्यासाठी कंपनी तुम्हाला मानधन देऊ करते. अर्थात याचं मानधन अधिक नसलं तरी यामाध्यमातून एक मिळकतीचं साधन म्हणून तुम्ही याकडे पाहू शकता.

गुगल प्ले-स्टोअरवर असे अनेक अॅप्स आहेत की ज्यावर तुम्हाला फक्त गेम्स खेळायचे आहेत आणि त्यासाठी कंपनी तुम्हाला पैसे देते. गेम खेळून तुम्ही जितके कॉइन्स जमा करता त्यानुसार तुम्हाला कंपनी पैसे देते. त्यामुळे गेमिंगमध्ये आवड असणारे या पर्यायाचा विचार करतात आणि यामाध्यमातून बऱ्यापैकी कमाई करतात.