Coronavirus: अफवांविरोधात लढण्यासाठी केंद्राचा व्हॉट्सअ‍ॅप नंबर; चॅटबोट देणार उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 02:46 PM2020-03-20T14:46:27+5:302020-03-20T14:58:43+5:30

सोशल मीडीयावर अफवा पसरविण्यासाठी व्हॉट्सअपचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. यामुळे याच प्लॅटफॉर्मवर केंद्र सरकारने चॅटबोट अक्टिव्ह केले आहे. याद्वारे तुम्ही प्रश्न विचारून उत्तरे मिळवू शकता.

सोशल मीडियावर कोरोनाबाबत अफवांचा पाऊस पडत असताना अचूक माहिती देण्यासाठी केंद्र सरकारने पाऊल उचलले आहे.

सोशल मीडीयावर अफवा पसरविण्यासाठी व्हॉट्सअपचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. यामुळे याच प्लॅटफॉर्मवर केंद्र सरकारने चॅटबोट अक्टिव्ह केले आहे. याद्वारे तुम्ही प्रश्न विचारून उत्तरे मिळवू शकता.

गोमूत्रापासून तुरटी, शेणापर्यंत कोरोनाला मारू शकतात अशा अफवा पसरल्या आहेत.

या WhatsApp Chatbot चे नाव MyGov Corona Helpdesk असे ठेवण्यात आले असून तो सर्व युजरना उपलब्ध असणार आहे.

यासाठी केवळ तुम्हाला हा नंबर कॉन्टॅक्टमध्ये सेव्ह करावा लागणार आहे. हा नंबर सेव्ह झाला की त्यावर तुम्हाला नमस्ते असा मेसेज पाठविला जाणार आहे.

कोरोनाच्या अफवांना रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले असून त्यावर कोरनाची लक्षणे, कोरोना व्हायरस कसा पसरतो? त्याचे संक्रमण कसे कमी करायचे आदी प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत.

सर्वात आधी तुम्हाला 9013151515 हा नंबर मोबाईलमध्ये सेव्हा करावा लागणार आहे.

यानंतर तुम्हाला चॅटबोट प्रश्न पाठविणार आहे. त्यामध्ये A,B,C, D अशी उत्तरे द्यायची आहेत. कारण चॅटबोट हे रोबोच सॉफ्टवेअर असल्याने ते तुमची भाषा समजू शकत नाही.

यामुळे चॅटबोटला त्याला समजेल अशा अक्षरांच्या पर्यायाची उत्तरे पाठवावी लागणार आहेत. प्रत्येक मॅसेमध्ये तुम्हाला हेल्पलाईन नंबर, इमेल आणि युट्युब व्हिडीओची लिंक दिली जाणार आहे.

यामध्ये तुम्ही कोणती काळजी घ्यावी, याचेही मार्गदर्शन केले जाणार आहे.

आयसीएमआरनुसार कोरोना व्हायरसचे भारतात २०६ रुग्ण आढळले असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर १९ जण या आजारातून मुक्त झाले आहेत.